नवी दिल्ली/ भोपाळ - आज २९ जुलैला जगभरात व्याघ्र दिवस साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी भारतातील वाघांच्या संख्येचा अहवाल जाहीर केला आहे. यातील आकडेवारीनुसार भारतात वाघांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या २,९७६ इतकी असल्याचे मोदींनी सांगितले. ही संख्यावाढ संकल्पसिद्धीचे उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
यातच मध्यप्रदेशात यावर्षी वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. वनविभागाच्या अंदाजानुसार सध्या प्रदेशातील वाघांची आकडेवारी ४०० च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. यापुर्वी वाघांची गणना २०१४ मध्ये करण्यात आली होती.
विशेष म्हणजे मध्यप्रदेश हा एकेकाळी 'टाइगर स्टेट' म्हणून ओळखला जायचा. वन विभागाने दिलेलिया माहितीनुसार, मागच्या काही वर्षात वाघाच्या संरक्षणासंदर्भात केलेल्या कार्यामुळे वाघांच्या संख्येत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर राज्यात संरक्षणात्मक कार्य व्यवस्थीतरित्या पार पाडले गेले तर वाघांच्या संख्येत आणखी वाढ होऊन हा आकडा ४०० पर्यंत पोहचू शकतो असेही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वनमंत्री उमंग सिंघार यांचेनुसार एकीकडे वाघांच्या वंशवृद्धीत वाढ झाली असून शिकारीच्या घटनाक्रमातही घट झाली आहे. त्यामुळेच वाघांच्या संख्येत वाढ होऊ शकली. मागील ७ वर्षात तब्बल १४१ पेक्षा जास्त वाघ मारले गेले. यात सर्वात जास्त घटना २०१० मध्ये घडल्या होत्या, त्यावेळेस राज्यात २५७ वाघ होते. त्यानंतर वाघांच्या संरक्षणावर भर दिले गेले. आणि, २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत २० टक्क्यांनी भर पडत वाघांची संख्या ३०८ नोंदविल्या गेली. यावेळी वाघांच्या संख्येत मागल्या आकडेवारीच्या तुलनेत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या मध्यप्रदेशात वाघांच्या संरक्षणासाठी काही चांगले पाऊले उचलण्यात आली आहेत. यात अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानातील विस्थापितांना दुसरीकडे स्थापित करण्यासंदर्भातही प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याचप्रकारे वाघांच्या पुनर्वसनासंदर्भात राज्यातर्फे आणखी काही कार्यात्मक पाऊले उचलण्यात आल्याचे वन्यजीव विशेषज्ञांनी सांगितले आहे.