ETV Bharat / bharat

'सपोर्ट नर्सेस अ‌‍‌ॅण्ड मिडवाइव्ज', डब्ल्यूएचओकडून यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम परिचारकांना समर्पित - world health emergency

जगभरातील परिचारिकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणार्‍या देशांना प्रतिवर्षी आठ टक्क्यांनी परिचारिकांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, आरोग्य प्रणाली अधिक चांगली बनवण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक व्यक्तीमागे 10 डॉलर खर्च करण्याची गरज आहे.

सपोर्ट नर्सेस अ‌‍‌ॅण्ड मिडवाइव्ज
सपोर्ट नर्सेस अ‌‍‌ॅण्ड मिडवाइव्ज
author img

By

Published : Apr 8, 2020, 1:51 PM IST

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूमुळे महामारी पसरली आहे. याचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. या विषाणूच्या प्रसारामुळे जगभरातील देशांना आरोग्य कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यान्वित करावे लागले आहे. नुकत्याच दि स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग 2020 कडून आलेल्या अहवालानुसार, जगभरात परिचारिकांची (आरोग्य कर्मचारी) कमतरता आहे. कोणत्याही महामारीमध्ये लढण्यासाठी यांची भूमिका महत्त्वाची असते. यंदाच्या आरोग्य दिनाची थीम परिचारिकांना समर्पित असल्याचे डब्ल्यूएचओने (जागतिक आरोग्य संघटना) म्हटले आहे. यावेळची थीम 'सपोर्ट नर्सेस अ‌‍‌ॅण्ड मिडवाइव्ज' अशी आहे.

या अहवालानुसार, जगभरात आरोग्य सेवांमध्ये सुधारणा आणण्यासाठी नर्सिंग क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या आणि प्राथमिक क्षेत्रांमधील नर्सिंग शिक्षणात आणि त्यांच्या नोकरीतील सेवेदरम्यान करावे लागणारे काम यात खूप फरक आहे. जगभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये परिचारिकांची संख्या अर्ध्याहून अधिक आहे. त्या संपूर्ण आरोग्य प्रणालीला महत्त्वाची सेवा देतात. इतिहासानुसार, जगभरातील महामारी लढण्यासाठी सर्वांत पुढे परिचारिकाच असतात.

आजही जगभरात कोरोना विषाणूशी लढताना परिचारिकांच्या कामातून त्यांची करुणा शौर्य आणि साहस यांचा प्रत्यय येत आहे. मात्र आत्तापर्यंत त्यांचे कार्य फारसे अधोरेखित झालेले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक तेदरोस अदहानोम गेब्रेयसस यांनी परिचारिका या आरोग्य विभागाचा कणा असल्याचे म्हटले आहे. त्या कोरोना विषाणूशी पूर्ण ताकदीने लढत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

परिचारिकांची संख्या -

जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (आयसीएन - इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्स) आणि नर्सिंग नाऊ यांच्या संयुक्त अहवालानुसार जगभरात दोन कोटी 80 लाख परिचारिका आहेत.

2013 ते 18 दरम्यान परिचारिकांच्या संख्येमध्ये 47 लाखांची वाढ झाली आहे. तथापि, जगभरात 59 लाख परिचारिका अद्यापही कमी पडत आहेत. आफ्रिका, आग्नेय आशिया आणि डब्ल्यूएचओच्या पूर्व भूमध्य क्षेत्रांमध्ये आणि लॅटिन अमेरिकेच्या काही भागांमध्ये परिचारिकांची संख्या खूप कमी आहे.

अहवालानुसार 80 टक्‍क्‍यांहून अधिक परिचारिका जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या राहत असलेल्या भागात काम करतात. प्रत्येक आठ परिचारकांपैकी एका परिचारिकाला स्वतःची मातृभूमी आणि प्रशिक्षण स्थळ सोडून इतर देशांमध्ये कामासाठी जावे लागते.

येत्या दहा वर्षांमध्ये प्रत्येक सहा महिन्यांना एक परिचारक सेवानिवृत्त होईल. यामुळे येत्या काळात या क्षेत्रातील संकटात आणखी भर पडू शकते.

अहवालानुसार, जगभरातील परिचारिकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणार्‍या देशांना प्रतिवर्षी आठ टक्क्यांनी परिचारिकांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, आरोग्य प्रणाली अधिक चांगली बनवण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक व्यक्तीमागे 10 डॉलर खर्च करण्याची गरज आहे.

या वर्षीची थीम परिचारिकांना समर्पित -

आज जागतिक आरोग्य दिवस आहे या यंदाचा आरोग्य दिवस जगभरातील आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांना समर्पित आहे. कारण परिचारिका कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या लढाईत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यंदाच्या आरोग्य दिवसाची थीम 'सपोर्ट नर्सेस अ‌‍‌ॅण्ड मिडवाइव्ज' अशी ठेवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.