शिमला - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अनेक मजूर, कामगार आणि पर्यटक देशाच्या विविध भागांत अडकून पडले आहेत. हिमालच प्रदेश राज्यातील मदत केंद्रामध्ये थांबलेले नागरिक आपला वेळ शिक्षणावर खर्च करत आहेत. येथे अशिक्षित मजूरांना साक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत.
राज्यातील चंपावत जिल्ह्यातील बालिका इंटर कॉलेज लोरहाघाटचे रुपांतर रिलिफ सेंटरमध्ये करण्यात आले आहे.या ठिकाणी मजूरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तेथे थांबलेल्या अशिक्षित मजूरांना शिकविण्यात येत आहे. त्यांची परिक्षाही आयोजित करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. याकामी शाळेचे शिक्षण मदत करत आहेत.