जयपूर - राजस्थानातील एक महिला मृत्यूनंतरही देशसेवेच्या कामात आली आहे. या भीक मागणाऱ्या महिलेने ६ लाख रुपये पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दिले आहेत. ६ महिन्यांपूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला होता.
देवकी असे या महिलेचे नाव आहे. आपण जमा केलेले पैसै योग्य कामाला लागावेत, अशी सदर महिलेची इच्छा होती. यामुळे महिलेने जमा केलेले पैसे वीरमरण आलेल्या कुटुंबीयांना देण्यात आले आहेत.
अजमेरच्या बजरंग गढ येथे एक महिला गेल्या ७ वर्षांपासून भीक मागत होती. एक-एक रुपया जमा करून महिला आपला उदरनिर्वाह चालवत होती. भीक मागून जमा केलेले पैसे महिलेने बजरंग गढ येथील २ दुकानदारांजवळ जमा केले होते. आपले पैसे चांगल्या कामाला लावा, असे महिलेने त्या दुकानदारांना सांगितले होते.
दुकानदार संदीप गौड यांनी महिलेच्या नावाने बँक खाते उघडून त्यात महिलेचे पैसे साठवायला सुरुवात केली. देवकी यांच्या मृत्यूनंतर हे पैसे योग्य कामी लावण्याच्या विचारात दुकानदार होते. अखेर आज देवकी यांनी जमा केलेले ६ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा 'डीडी' जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासा सुपूर्त करण्यात आला.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)