ETV Bharat / bharat

अनैतिक संबंधास नकार दिल्याने जावयाची हत्या; सासूचे आत्मसमर्पण - हैदराबाद सासू जावई अनैतिक संबंध

३८ वर्षांच्या या महिलेचा पती तिला काही वर्षांपूर्वी सोडून निघून गेला होता. त्यानंतर तिचे या व्यक्तीसोबत संबंध जुळले होते. हे संबंध पुढेही सुरू ठेवण्याच्या उद्देशाने या महिलेने २०१९च्या नोव्हेंबरमध्ये आपल्या १९ वर्षीय मुलीचे लग्न या व्यक्तीसोबत लावून दिले होते...

Woman surrenders to cops after killing son-in-law
अनैतिक संबंधास नकार दिल्याने जावयाची हत्या; सासूने केले आत्मसमर्पण
author img

By

Published : Oct 30, 2020, 11:19 AM IST

हैदराबाद : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका सासूने आपल्या जावयाची हत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली. तेलंगणाच्या हैदराबादमध्ये हा प्रकार घडला. यानंतर सासूने स्वतःच पोलीस ठाण्यात जात आपल्या कृत्याची कबूली दिली.

मुलीच्या लग्नापूर्वीपासून होते संबंध..

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ३८ वर्षांच्या या महिलेला तीन मुले आहेत. तिचा पती तिला काही वर्षांपूर्वी सोडून निघून गेला होता. त्यानंतर तिचे या व्यक्तीसोबत संबंध जुळले होते. हे संबंध पुढेही सुरू ठेवण्याच्या उद्देशाने या महिलेने २०१९च्या नोव्हेंबरमध्ये आपल्या १९ वर्षीय मुलीचे लग्न या व्यक्तीसोबत लावून दिले होते.

मुलीने केली होती आत्महत्या..

लग्नाच्या वेळी मुलीला हा सर्व प्रकार माहित नव्हता. लग्नानंतर काही महिन्यांतच तिला सर्व प्रकार समजताच, तिने आईला घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र, आई आणि जावई दोघांनीही तिलाच धमक्या देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे या मुलीने आत्महत्या केली होती.

आत्महत्येच्या प्रकरणात दोघांवर गुन्हे..

यानंतर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आई आणि जावई यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर जावई पुन्हा आपल्या सासूसोबत राहू लागला. मात्र, यावेळी त्याने झाल्या प्रकाराला सासूला जबाबदार ठरवत तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, तिच्यासोबत पुन्हा संबंध ठेवण्यासही तो नकार देत होता. या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून सासूने झोपेत असणाऱ्या जावयावर चाकूने वार करत त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : आंध्र प्रदेशात भीषण अपघात; सात जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.