ETV Bharat / bharat

'सीएए'विरोधी कार्यक्रमात तरूणीने दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, ओवैसींकडून घटनेचा निषेध - बंगळुरू सीएए विरोधी कार्यक्रम

या तरूणीचे नाव अमूल्या असल्याची माहिती समोर येत आहे. 'संविधान वाचवा' या कार्यक्रमासाठी ओवैसी उपस्थित होते. ते व्यासपीठावर आल्यानंतर, संयोजकांनी या तरूणीला बोलण्याची संधी देत तिच्याकडे माईक सूपूर्द केला. यावेळी तिने समोरील लोकांना आपल्यासोबत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यास सांगितले.

Woman Raises Pro-Pakistan Slogan at Anti-CAA Stir in Bengaluru, Owaisi Rushes to Snatch Her Mic
'सीएए'विरोधी कार्यक्रमात तरूणीने दिले 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे, ओवैसींनी घटनेची केली निंदा
author img

By

Published : Feb 20, 2020, 9:37 PM IST

Updated : Feb 20, 2020, 9:49 PM IST

बंगळुरू - कर्नाटकमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये एका तरूणीने 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीदेखील उपस्थित होते. या प्रकारानंतर त्यांनी तातडीने त्या तरूणीच्या हातातील माईक हिसकावून घेत या प्रकाराचा निषेध केला.

  • #WATCH The full clip of the incident where a woman named Amulya at an anti-CAA-NRC rally in Bengaluru raised slogan of 'Pakistan zindabad' today. AIMIM Chief Asaddudin Owaisi present at rally stopped the woman from raising the slogan; He has condemned the incident. pic.twitter.com/wvzFIfbnAJ

    — ANI (@ANI) February 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या तरूणीचे नाव अमूल्या असल्याची माहिती समोर येत आहे. 'संविधान वाचवा' या कार्यक्रमासाठी ओवैसी उपस्थित होते. ते व्यासपीठावर आल्यानंतर, संयोजकांनी या तरूणीला बोलण्याची संधी देत तिच्याकडे माईक सूपूर्द केला. यावेळी तिने समोरील लोकांना आपल्यासोबत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यास सांगितले.

या सर्व गोंधळानंतर पोलिसांनी त्या तरूणीला ताब्यात घेतले. त्यानंतर जमलेल्या लोकांना संबोधित करत ओवैसींना या प्रकरणाचा तीव्र निषेध केला. माझा किंवा माझ्या पक्षाचा या तरूणीशी काहीही संबंध नाही. आम्ही घडलेल्या घटनेचा निषेध करतो. कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिला इथे बोलवायला नको होते. आम्ही भारतासाठी आहोत आणि आम्ही आपले शत्रूराष्ट्र पाकिस्तानला पाठिंबा देत नाही. आम्ही केवळ भारताला वाचवण्यासाठी हे आंदोलन करत आहोत, असे ओवैसींनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जदयूचे नगरसेवक इमरान पाशा यांनी असा आरोप केला आहे, की या तरूणीला विरोधी पक्षाने पाठवले होते. याठिकाणी व्यासपीठावर बोलणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये या महिलेचे नाव नव्हते. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या तरूणीवर कलम १२४-अ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांमार्फत तिची चौकशी झाल्यानंतर तिला न्यायालयात हजर केले जाईल.

हेही वाचा : 'आम्ही १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींना वरचढ ठरू... हे लक्षात ठेवा!'

Last Updated : Feb 20, 2020, 9:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.