ETV Bharat / bharat

'केवत अन् शबरीच्या मूर्तींशिवाय अयोध्येतील राममंदिर अपूर्ण..'

एका कार्यक्रमामध्ये बोलताना गोव्याचे राज्यपाल मलिक म्हणाले की, अयोध्येमध्ये रामाचे भव्य मंदिर उभारले जावे, ही संपूर्ण देशाची इच्छा आहे. मात्र, रामाला त्याच्या प्रवासात ज्या लोकांनी मदत केली, त्या लोकांनाही या मंदिरात जागा मिळावी, अशी इच्छा मात्र कोणीही व्यक्त करताना दिसत नाही. श्रीराम जेव्हा लंकेला जात होते, त्यादरम्यान त्यांना अनेक आदिवासी लोकांनी आणि अल्पसंख्याक लोकांनी मदत केली. मात्र, अजूनही कोणी केवत आणि शबरी यांच्या मूर्तींसाठी मागणी करताना दिसत नाही.

Without the Idols of Kevat and Shabri the Ram Mandir will neither be complete nor be grand says Goa governer Satya pal Malik
author img

By

Published : Nov 22, 2019, 8:26 AM IST

पणजी - श्रीरामाला त्याच्या संपूर्ण प्रवासात बऱ्याच लोकांची मदत झाली. त्यामधील आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांचाही समावेश होता. अयोध्येतील राममंदिर उभारण्यासाठी जी समिती नेमली जाईल, तिने अशा लोकांच्या मूर्तींची स्थापना करण्याबाबत विचार करायला हवा, असे मत गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले.

  • Satya Pal Malik: I'm yet to hear people demanding idols of Kevat & Shabri (who helped Lord Ram) in Ram Darbar.The day the trust is made for the temple I will write letter to it urging them to install idols of people who fought with him, on the side of truth.That is the true India https://t.co/8h1oQ9tPp0

    — ANI (@ANI) November 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दक्षिण गोव्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना मलिक म्हणाले की, अयोध्येमध्ये रामाचे भव्य मंदिर उभारले जावे, ही संपूर्ण देशाची इच्छा आहे. मात्र, रामाला त्याच्या प्रवासात ज्या लोकांनी मदत केली, त्या लोकांनाही या मंदिरात जागा मिळावी, अशी इच्छा मात्र कोणीही व्यक्त करताना दिसत नाही. श्रीराम जेव्हा लंकेला जात होते, त्यादरम्यान त्यांना अनेक आदिवासी लोकांनी आणि अल्पसंख्याक लोकांनी मदत केली. मात्र, अजूनही कोणी केवत आणि शबरी यांच्या मूर्तींसाठी मागणी करताना दिसत नाही.

ज्या दिवशी मंदिर समितीची घोषणा होईल, मी याही मूर्तींची स्थापना राममंदिरात करण्याची मागणी करणारे पत्र त्या समितीला लिहिणार आहे. हे तेच लोक होते जे रामाच्या बाजूने लढले, जे सत्याच्या बाजूने लढले. त्यांच्या मूर्तीही राममंदिरात असणे, हाच भारताचा खरा चेहरा असणार आहे. माझ्या या वक्तव्यावरून विवाद झाला तरी त्याची मला चिंता नाही, मात्र या लोकांच्या मूर्तींशिवाय हे राममंदिर ना संपूर्ण असेल ना भव्य, असेही मलिक पुढे म्हणाले.

हेही वाचा : देशाच्या संरक्षण सल्लागार समितीमध्ये मालेगाव स्फोटातील आरोपी 'प्रज्ञा ठाकूर'चाही समावेश!

Intro:Body:

'केवत अन् शबरीच्या मूर्तींशिवाय अयोध्येतील राममंदिर अपूर्ण..'

पणजी - श्रीरामाला त्याच्या संपूर्ण प्रवासात बऱ्याच लोकांची मदत झाली. त्यामधील आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांचाही समावेश होता. अयोध्येतील राममंदिर उभारण्यासाठी जी समिती नेमली जाईल, तिने अशा लोकांच्या मूर्तींची स्थापना करण्याबाबत विचार करायला हवा, असे मत गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले.

दक्षिण गोव्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना मलिक म्हणाले, की अयोध्येमध्ये रामाचे भव्य मंदिर उभारले जावे ही संपूर्ण देशाची इच्छा आहे. मात्र, रामाला त्याच्या प्रवासात ज्या लोकांनी मदत केली, त्या लोकांनाही या मंदिरात जागा मिळावी अशी इच्छा मात्र कोणीही व्यक्त करताना दिसत नाही. श्रीराम जेव्हा लंकेला जात होते, त्यादरम्यान त्यांना अनेक आदिवासी लोकांनी आणि अल्पसंख्यांक लोकांनी मदत केली. मात्र, अजूनही कोणी केवत आणि शबरी यांच्या मूर्तींसाठी मागणी करताना दिसत नाही.

ज्या दिवशी मंदिर समितीची घोषणा होईल, मी या लोकांच्या मूर्तींची स्थापना राममंदिरात करण्याची मागणी करणारे पत्र त्या समितीला लिहिणार आहे. हे तेच लोक होते जे रामाच्या बाजूने लढले, जे सत्याच्या बाजूने लढले. त्यांच्या मूर्तीही राममंदिरात असणे, हाच भारताचा खरा चेहरा असणार आहे. माझ्या या वक्तव्यावरून विवाद झाला तरी त्याची मला चिंता नाही, मात्र या लोकांच्या मूर्तींशिवाय हे राममंदिर ना संपूर्ण असेल ना भव्य, असेही मलिक पुढे म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.