ETV Bharat / bharat

खरीप हंगामावर कोरोनाचे सावट.. - खरीप हंगाम आणि कोरोना

तेलंगणा कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांना सुमारे 7.50 लाख क्विंटल बियाणांची सवलतीच्या दरात विक्री करण्याची योजना केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य बियाणे विकास प्राधिकरणाने शेतकऱ्यांकडून हे बियाणे खरेदी करुन शुद्धीकरण केंद्रांना पाठविणे आवश्यक आहे. बियाणे आवश्यक सेवांच्या यादीत मोडतात.

With transport restrictions, lockdown threatens to hit Kharif season
खरीप हंगामावर कोरोनाचे सावट..
author img

By

Published : Apr 6, 2020, 4:51 PM IST

कोविड-19 मुळे पुढील खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बियाणे शुद्धीकरण आणि वेष्टण घालण्याच्या प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. जर उद्योगांना बियाणांवर पुढील प्रक्रिया करता आली नाही, तर पुढच्या महिन्यात देशभरात बियाणांची विक्री करणे अवघड होईल, ही बाब नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएससी) अलीकडे केंद्र आणि राज्य सरकारांच्या निदर्शनास आणून दिली आहे. सध्याच्या हंगामात, ऑक्टोबर महिन्यात उगवलेले पिके आता काढणीच्या टप्प्यात आहेत. पिकांची कापणी झाल्यानंतर, बियाणे शेतांमधून शुद्धीकरण केंद्रात पाठवणे आवश्यक आहे. केवळ त्यांचे शुद्धीकरण आणि गुणवत्तेची चाचणी केल्यानंतरच खरीप हंगामासाठी त्यांची विक्री शक्य होईल.

तेलंगणा कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांना सुमारे 7.50 लाख क्विंटल बियाणांची सवलतीच्या दरात विक्री करण्याची योजना केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य बियाणे विकास प्राधिकरणाने शेतकऱ्यांकडून हे बियाणे खरेदी करुन शुद्धीकरण केंद्रांना पाठविणे आवश्यक आहे. बियाणे आवश्यक सेवांच्या यादीत मोडतात. सरकारने आवश्यक सेवांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे लॉकडाऊनच्या काळात बियाणे शुद्धीकरण प्रकल्प सुरु ठेवावेत अशी मागणी एनएससीचे अध्यक्ष एम प्रभाकर राव यांनी केंद्रीय कृषी सचिव आणि राज्य कृषी मंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.

ते म्हणाले की, बियाणे कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवल्यास जाण्याची परवानगी मिळावी आणि बियाणे वाहून नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी थांबवू नये. पंजाबमध्ये पुढील महिन्यात कापूस लागवडीस सुरुवात होईल. आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये सर्व पिकांच्या बियाणांची विक्री मे महिन्यापासून सुरु होणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी घडण्यासाठी बियाणे कंपन्यांना लॉकडाऊनमधून वगळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, इतर राज्यांमधूनही बियाणांचा पुरवठा होण्यासाठी आंततराज्य परिवहनास मंजुरी द्यावी, अशीही मागणी राव यांनी केली आहे. तेलंगण राज्य बियाणे आणि सेंद्रीय प्रमाणपत्र प्राधिकरणाचे संचालक केशवुलू यांनीदेखील या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

राज्य कृषी विभागाने नुकतेच बियाणे कंपन्यांना तेलंगणमध्ये विक्रीसाठी कापसाच्या 1.10 कोटी बियाण्यांची पाकीटे तयार करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपन्यांनी सरकारकडे लॉकडाऊनमधून सवलत देण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा : भाजप महिला मोर्चा अध्यक्षांनी लावले 'दिवे', पतीसह केला हवेत गोळीबार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.