ETV Bharat / bharat

सुशांत सिंह प्रकरण : सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील करणार नव्या फॉरेन्सिक पथकाची मागणी

सुशांतचा मृतदेह नसतानाही एम्स त्याच्या शवविच्छेदनाबाबत संपूर्ण अहवाल कसा सादर करु शकते? असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला. तसेच, त्यांनी कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन पथकाच्या कामावरही शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, की एम्सच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूची वेळही नोंदवण्यात आली नव्हती.

author img

By

Published : Oct 5, 2020, 10:47 AM IST

Will request CBI chief to constitute fresh forensic team: Sushant Singh Rajput's family lawyer
सुशांत सिंह प्रकरण : सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील करणार नव्या फॉरेन्सिक पथकाची मागणी

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने नव्या फॉरेन्सिक पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे विकास सिंह यांनी म्हटले आहे. विकास सिंह हे सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील आहेत. एम्सने दिलेल्या अहवालाने आपण अस्वस्थ झाले असून, याबाबत विचार करत असल्याचे सिंह यांनी म्हटले. सुशांत सिंहने आत्महत्या केली होती, असा अहवाल एम्सने शनिवारी जाहीर केला, तर त्याचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सुशांतचा मृतदेह नसतानाही एम्स त्याच्या शवविच्छेदनाबाबत संपूर्ण अहवाल कसा सादर करु शकते? असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला. तसेच, त्यांनी कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन पथकाच्या कामावरही शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, की एम्सच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूची वेळही नोंदवण्यात आली नव्हती.

एम्सच्या सहा सदस्यीय पथकाने शनिवारी आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला. सुशांतच्या शरीरात विषाचे किंवा अमली पदार्थाचे कोणतेही अंश आढळून आले नाहीत. तसेच, त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्याचा मृत्यू हा आत्महत्या केल्यामुळेच झाला आहे, त्याची हत्या झाली नव्हती असे एम्सने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते.

हेही वाचा : मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता; 'एम्स'चा अहवाल ही त्याची पोचपावती - पोलीस आयुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.