ETV Bharat / bharat

लडाखमधल्या 'गलवान' खोऱ्याला एका काश्मिरीचे नाव का दिले? जाणून घ्या...

author img

By

Published : Jun 17, 2020, 1:21 PM IST

भारत-चीन सीमेवरचा तणाव कसा वाढत आहे? तो कसा निवळेल? दोन देशांच्या लष्कराचे संबंध कसे आहेत, याबद्दल तज्ज्ञ चर्चा करत आहेत. पण गलवान हे काश्मिरी नाव लडाखला कसे पडले आणि जगभरात ते कसे केंद्रबिंदू बनले, याचाच विचार काश्मीरमधले सर्वसामान्य करीत आहेत.

Why is the Galwan valley in Ladakh named after a Kashmiri?
लडाखमधल्या 'गलवान' खोऱ्याला एका काश्मिरीचे नाव का दिले? जाणून घ्या...

श्रीनगर - लडाखमधील भारत आणि चीन सीमारेषेवर तणाव असताना एका जागेचा उल्लेख सतत व्हायला लागला आहे. ती जागा म्हणजे गलवान खोरे आणि त्याच्याशी असलेला काश्मीरचा संबंध.

भारत-चीन सीमेवरचा तणाव कसा वाढत आहे, तो कसा निवळेल, दोन देशांच्या लष्कराचे संबंध कसे आहेत, याबद्दल तज्ज्ञ चर्चा करत आहेत. पण गलवान हे काश्मिरी नाव लडाखला कसे पडले आणि जगभरात ते कसे केंद्रबिंदू बनले, याचाच विचार काश्मीरमधले सर्वसामान्य करत आहेत.

भारत-चीन सीमेजवळचे हे गलवान खोरे. तिथे गलवान नावाचा झरा हिमालयातून वाहतो. अक्साई चीन आणि पूर्व लडाख इथून काराकोरम पर्वतरांगांमधून गलवान नदी ८० किलोमीटर वाहत सिंधू नदीची उपनदी असलेल्या श्योक नदीला मिळते. हा प्रदेश रणनीतीसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि याच प्रदेशामुळे भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यानही हे खोरे केंद्रस्थानी होते.

या प्रदेशाला काश्मीर प्रांतातले गुलाम रसुल शहा ऊर्फ गलवान आणि त्यांचे पूर्वज कारारा गलवान यांचे नाव देण्यात आले. गलवान काश्मीरच्या डोग्रा राजवटीच्या अत्याचाराला घाबरून काश्मीरमधून पळून बाल्टिस्तान येथे स्थायिक झाले होते.

'ईटीव्ही भारत'ने गलवान प्रदेशाचा इतिहास आणि त्याच्या नावाबद्दल जाणून घेण्यासाठी गलवान वंशजांसोबत बातचीत केली. गुलाम रसूल गलवानचे नातू मोहम्मद अमिन म्हणाले, 'डोग्रा राजवटीत कारा गलवान आपल्या सुरक्षेसाठी पळाले आणि बल्टिस्तानला येऊन राहिले.'

'गुलाम रसूल यांचा जन्म लेह इथे १८७८ साली झाला. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी लडाखच्या भूभागावर आणि कोराकाराम ते मध्य आशियामार्गे ब्रिटिश पर्यटकांना आणि मोहीम करणाऱ्यांना गाईड बनून मार्गदर्शन करण्यास सुरवात केली, अशी माहिती अमिन यांनी दिली.

गलवान यांचे मुलगे आणि नातवंडे लेहमध्ये स्थायिक झाले आणि त्यांची कुटुंबही याच प्रदेशात राहू लागली, असे सांगून अमिन म्हणाले, भारत-चीनमध्ये तणाव वाढल्याने लेहमधली जनता काळजीत पडली आहे. गेले काही आठवडे एलएसीवर भारतीय लष्कराच्या हालचालीही वाढल्या आहेत, त्यामुळे चिंता आहे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, 'लडाखच्या जनतेचा पूर्ण पाठिंबा भारतीय लष्कराला आहे आणि सध्याच्या परिस्थितीत त्यांना मदतही करू.'

दोन आठवड्यापूर्वी 'ईटीव्ही भारत'ने लडाखचे लेखक आणि इतिहास तज्ज्ञ गानी शेख यांच्याकडून गलवान खोरे आणि रसूल गलवान यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली.

मोहम्मद अमिन गलवान यांनी सांगितलेल्याप्रमाणेच शेख यांनी 'ईटीव्ही भारत'ला हाच इतिहास सांगितला.

शेख म्हणाले, 'गुलाम रसूल यांनी मोहिमेवर आलेल्या ब्रिटिशांना हिमालयीन पर्वतरांगांमधून मध्य आशियाला पोहोचण्यास मदत केली.'

सध्याच्या पार्श्वभूमीवर गुलाम रसूल गलवान यांनी लिहिलेल्या 'सर्व्हंट ऑफ साहिबस' या पुस्तकावरील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर गर्दी झाली आहे. या पुस्तकाची प्रस्तावना शोधमोहिमेवर निघालेला ब्रिटिश प्रवासी फ्रँसिस यंगहसबंड यांनी लिहिली आहे. या पुस्तकाची शिफारस केली जात आहे आणि त्याच्या प्रती वाटल्या जात आहेत.

(लेखक - मीर फरात)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.