ETV Bharat / bharat

चांद्रयाण- २ दक्षिण ध्रुवावरच का उतरणार? - अंतराळ

आज रात्री दीड वाजता भारताचं चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार असून, त्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. विज्ञानक्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीपासून भारत अवघा काही तास दूर आहे.

चांद्रयाण- २ दक्षिण ध्रुवावर उतरणार
author img

By

Published : Sep 7, 2019, 1:09 AM IST

बंगळुरु - भारताचं 'चांद्रयान-२' चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज आहे. शनिवारी पहाटे दीड ते दोन वाजता दरम्यान चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार आहे, त्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. विज्ञानक्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीपासून भारत अवघे काही तास दूर आहे. या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व क्षणाला पाहाण्यासाठी देशासह जगभरातील कानाकोपऱ्यात असलेले भारतीय अतूर झाले आहेत. दक्षिण ध्रुवावर चांद्रयाण उतरवणारा भारत जगातील पहिलाच देश ठरणार आहे. मात्र, हे यान दक्षिण ध्रुवावरच का...

हे यान दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, कारण आजवर त्याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे या मोहिमेतून काहीतरी नवं सापडेल, असं मानलं जात आहे. ISRO चे चांद्रयान-2 चंद्राच्या ज्या भागावर उतरणार आहे त्याला डार्क साइड असे म्हणतात. या डार्क साईडबद्दल जगाला फार माहिती नाही. त्याबद्दलची माहिती या मोहिमेतून मिळणार आहे.

चंद्रायान-2 च्या माध्यमातून चंद्राच्या भौगोलिक वातावरणाचा, तेथील खनिजे आणि पाण्याची उपलब्धता याची माहिती मिळवली जाणार आहे. चांद्रयान-2 च्या माध्यमातून भारताने अन्य देशांच्या तुलनेत आघाडी घेतल्याचे मानले जात आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हेच आहे की, आतापर्यंत दक्षिण ध्रुवावर कोणीही पोहोचले नाही.

बंगळुरु
चांद्रयाण- २ दक्षिण ध्रुवावर उतरणार

दक्षिण ध्रुवाचा मोठा प्रदेश सूर्याच्या सावलीत असतो. सूर्यकिरणं कमी प्रमाणात पोहोचल्यामुळे हा प्रदेश अत्यंत थंड झाला आहे. त्यामुळे कायम अंधारात असणाऱ्या या प्रदेशात पाण्याचे अंश किंवा खनिजं असतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या काही चांद्रमोहिमांमधून त्यावर थोडंफार संशोधनही झालं आहे. जर त्यावर अधिक संशोधन झालं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध लागला तर भविष्यात माणसाला ते फायदेशीर ठरेल.

चंद्रावर माणसाचं लक्ष
जर माणूस अंतराळात गेला नाही तर माणसाला भविष्यच उरणार नाही, असं मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी व्यक्त केलं होतं. अंतराळ मोहिमा पार पाडण्यासाठी चंद्र अत्यंत आश्वासक आहे. पृथ्वीच्या प्राचीन इतिहासाचा आणि चंद्राचा संबंध आहे. सौरमालेच्या निर्मितीचे ऐतिहासिक पुरावेही यामुळे समोर येतात त्यामुळेच चंद्रावरती इतकं लक्ष दिलं जातं.

अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार
इस्रोचे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर भारत आतापर्यंत न मिळालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणार आहे. दक्षिण ध्रुवावर अशी खनिजे मिळू शकतात ज्यामुळे मानवाच्या पुढील 500 वर्षातील गरजांची पूर्ततात होऊ शकते. या खनिजांच्या विक्रीतून लाखो डॉलरची कमाई देखील होऊ शकते. चंद्रावरून मिळणारी ही ऊर्जा केवळ सुरक्षित असणार नाही तर ती प्रदूषण मुक्त देखील असेल.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.