ETV Bharat / bharat

अमित शाहांनी निवडणूक लढवण्यासाठी आडवाणींना डालवून गांधीनगरच का निवडले? - General Election

मागील २३ वर्षापासून अमित शाहांनी गांधीनगरचा गड राखून ठेवला आहे. या मतदार संघातून भाजपच्या दिग्गज नेत्यांनी निवडणूक लढवली आहे. तर तब्बल ६ वेळा भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्णा आडवाणी निवडणूक जिंकले आहेत. मग त्यांना डालवून अमित शाह येथून का निवडणूक लढवत आहेत ?

लालकृष्ण आडवाणी
author img

By

Published : Mar 24, 2019, 1:47 PM IST

गांधीनगर - भाजप अध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर येथून लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहेत. मागील २३ वर्षापासून भाजपने हा गड राखून ठेवला आहे. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी तब्बल ६ वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. अमित शाहांनी अडवाणींना उमेदवारी न देता स्वतःसाठी हाच मतदार संघ का निवडला असावा?

भाजपला डोळे झाकून विश्वास आहे की या मतदार संघातून आपणच निवडून येणार. या मतदार संघातून निवडणूक लढवली तर आपण जुन्या नेत्यांच्या रांगेत येणार, असे अमित शाहांना वाटते. शाह यांनी या मतदार संघासाठी कठोर मेहनत घेतली आहे. येथून अटलबिहारी वाजपेयी यांनीही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमित शाह येथून निवडणूक जिंकले तर, पक्षामध्ये त्यांचा दर्जा अधिकच वाढेल.

२३ वर्षापासून गांधीनगरवर भाजपचा ताबा -

राजकारणातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आत्तापर्यंत या मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. १९८९ पासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. त्यावेळी भाजपचे कट्टर नेते शंकर सिंह बघेला येथून निवडणूक जिंकले होते. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लाल कृष्ण आडवाणी यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर सलग ६ वेळा त्यांनी येथून निवडणूक जिंकलेली आहे.

आडवाणींवर भ्रष्टाचाराचा आरोप -

आडवाणी यांचे नाव हवाला प्रकरणात आल्यानंतर काही काळासाठी ते राजकारणापासून दुर गेले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी येथून निवडणूक लढवली. त्यावेळी तेही येथून निवडून आले होते. मात्र, त्यांनी काही कारणास्तव ही जागा सोडली आणि येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. त्यामध्येही भाजपच विजयी ठरले.

अमित शाहांची रणनीती -

गांधीनगर मतदार संघातून भाजपचा कोणताही व्यक्ती जिंकला असेल तरी या सर्वांचे क्रेडिट अमित शाहांना जाते. शाह १९९६ पासूनच या मतदार संघाचे संयोजक राहिले आहेत. शाहांनीच भाजपसाठी ही जागा तयार केली आहे. येथे जवळपास १८ लाख नोंदणीकृत मतदार आहेत.

अमित शाहांनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर पक्षामध्ये अंतर्कलह सुरू झालेले दिसतात. आडवाणींना पक्षाने चक्क रामराम ठोकल्याचे दिसत आहे. एके काळी भाजपची धुरा सांभाळणारे आडवाणी यावेळी निवडणूक लढवत नसल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज दिसत आहेत.

Intro:Body:

ठरलं तर! या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'पती पत्नी और वो' 

मुंबई - १९८७ मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. तर, आता चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पती, पत्नी और वो’ हा चित्रपट बी. आर. चोप्रा यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाच्या रिमेकची जबाबदारी मुदस्सर अजीज यांनी स्वीकारली आहे. तर भूषण कुमार, कृष्णन कुमार, रेणू चोप्रा आणि जुनो चोप्रा यांची निर्मिती असणार आहे. 

या चित्रपटातून अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे, चित्रपटाच्या यशाचा तिच्या बॉलिवूडमधील करिअरवर नक्कीच परिणाम होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तर दुसरीकडे कार्तिक आणि भूमीची जोडी प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरते का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.