ETV Bharat / bharat

दिल्लीत गोंधळ घालणारा महाराष्ट्रातील 'तो' तरुण कोण ? अन् काय आहे त्याची मागणी ? - youth

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजयसिंह बिश्त म्हटल्यामुळे नचिकेतने काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला.

नचिकेत वाल्हेकर
author img

By

Published : May 15, 2019, 6:53 PM IST

Updated : May 15, 2019, 10:13 PM IST

नवी दिल्ली - काँग्रसेचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत गोंधळ घालणारा तरुण हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथील असून त्याचे नाव नचिकेत वाल्हेकर असे आहे.

नचिकेत वाल्हेकर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजयसिंह बिश्त म्हटल्यामुळे नचिकेतने काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. योगी आदित्यानाथ यांना त्यांचे नाव घेऊन उल्लेख करणे ही अपली संस्कृती नाही, असे करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. यानंतर त्याने वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

नचिकेत वाल्हेकर म्हणाला, माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी मी येथे आलेलो नाही. माझ्या काही मागण्या आहेत. पत्रकार परिषदेची जागा ही काही सरकारी हेड कॉटर नाही. येथे मी येऊ शकतो. ज्यांचे आई वडील, पत्नी किंवा पती विदेशी असतील त्यांनी भारतात निवडणुका लढवू नयेत, यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हीच माझी मागणी आहे.

कोण आहे नचिकेत...?
नचिकेत वाल्हेकर हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण या गावचा आहे. तो राष्ट्रीय स्वयंकेवक संघ, भाजप तसेच अण्णा हजारे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगतो. मात्र भाजप व अण्णा हजारे यांनी यापुर्वी तो आपला कार्यकर्ता असल्याचे नाकारले होते.

अरविंद केजरिवाल यांच्यावर फेकली होती शाई...
नोव्हेंबर २०१३ मध्ये आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्यावर नचिकेतने काळी शाई फेकली होती. त्यावेळी त्याने आपण भाजपचा कार्यकर्ता आणि अण्णांचा समर्थक असल्याचे सांगितले होते.

आपमध्येही केला होता प्रवेश..
शाई फेकल्याच्या प्रकरणानंतर २०१४ मध्ये नचिकेतने अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेले स्वराज हे पुस्तक वाचले. हे पुस्तक वाचून प्रभावित होऊन आपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

Intro:Body:

National News 02

Conclusion:
Last Updated : May 15, 2019, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.