कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अधिपत्याखाली नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्यांना (केंद्र सरकार) माझ्या मृतदेहावरून पुढे जावे लागेल, असा इशारा बॅनर्जी यांनी क्रेंद्र सरकारला दिला आहे.
-
West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: If you want to dismiss my government, you can, but I will never allow Citizenship Amendment Act (CAA) in Bengal. If they want to implement CAA, they will have to do it over my dead body. https://t.co/q0wEIdUnu9
— ANI (@ANI) 16 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: If you want to dismiss my government, you can, but I will never allow Citizenship Amendment Act (CAA) in Bengal. If they want to implement CAA, they will have to do it over my dead body. https://t.co/q0wEIdUnu9
— ANI (@ANI) 16 December 2019West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: If you want to dismiss my government, you can, but I will never allow Citizenship Amendment Act (CAA) in Bengal. If they want to implement CAA, they will have to do it over my dead body. https://t.co/q0wEIdUnu9
— ANI (@ANI) 16 December 2019
ममता यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये नागरिक्तव सुधारणा विधेयक लागू होणार नाही. जर तुम्हाला (केंद्र सरकार) माझे सरकार बरखास्त करणार असाल तर खुशाल करा. मात्र कायद्याची अंमलबजावणी बंगालमध्ये होणार नाही. त्यांना यासाठी माझ्या मृतदेहावरून पुढे जावे लागेल, असे ममता यांनी म्हटले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतासह दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. रविवारी दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली.