ETV Bharat / bharat

खासदार अर्जून सिंह यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून बराकपूरमध्ये १२ तासांचा बंद

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्यावर रविवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी सोमवारी भाजपकडून बराकपूरमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे.

भाजपाकडून बराकपूरमध्ये १२ तासांचा बंद
author img

By

Published : Sep 2, 2019, 11:07 AM IST

बराकपूर (पश्चिम बंगाल) - भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बराकपूरमध्ये भाजपकडून सोमवारी 12 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे.

  • West Bengal: Bharatiya Janata Party (BJP) has called for a 12-hour bandh today in Barrackpore, North 24 Parganas district from 6 am to 6 pm, to protest against the attack on party's MP Arjun Singh yesterday. pic.twitter.com/MuDKt5wprn

    — ANI (@ANI) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या गाडीवर रविवारी हल्ला झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात थोडफोड करण्यात आली होती. यात अर्जून सिंह हे स्वतः जखमी झाले आहेत. सिंह हे पश्चिम बंगालमधील बैरकपूर मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांच्यावर तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाचा ताबा घेऊ इच्छित होते, असेही अर्जुन सिंह यांनी म्हटले होते.

हेही वाचा... हरियाणात हिट अ‌ॅन्ड रन : दोन पादचाऱ्यांना भरधाव कारने चिरडले

बंदचा परिणाम...

अर्जुन सिंह यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपने केलेल्या बंदच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बराकपूरमध्ये सोमवारी सकाळपासूनच दुकाने, कापड गिरण्या, अनेक कारखाने बंद करण्यात आले. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून रास्तारोको व रेल्वेरोको आंदोलनही करण्यात आले आहे. बराकपूरच्या घोषपारा रोडच्या विविध भागात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी निषेध केला. कांकीनारा स्थानकात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा... 'एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये नाव नसलेल्यांना घाबरण्याचे कारण नाही.. तात्काळ ताब्यात घेणार नाही'

हेही वाचा... चांद्रयान - २ : ऑर्बिटरपासून वेगळा होणार लँडर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.