ETV Bharat / bharat

अयोध्या वाद : आज ५ वाजेपर्यंत सुनावणी संपणार; सरन्यायाधीशांचा आदेश - राम जन्मभुमी वाद

राम मंदिर बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी आज ५ वाजता सुनावणी पूर्ण होणार. त्यानंतर निकाल लिहण्यास सुरवात होणार.

अयोध्या
author img

By

Published : Oct 15, 2019, 5:51 PM IST

Updated : Oct 16, 2019, 7:03 PM IST

नवी दिल्ली - राम मंदिर बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज(बुधवार) सुनावणीचा शेवटचा असण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी सुनावणी १७ ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचे आदेश दोन्ही पक्षकारांना दिले होते. त्याआधीच सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. अयोध्या खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये १० डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

LIVE UPDATE:

  • हिंदू महासभेनं सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तफावत- वरिष्ठ वकील, राजीव धवन, मुस्लिम पक्षाचे वकील
  • अयोध्या खटल्यात दावा मागे घेतल्याचा कोणताही अर्ज केला नाही - जफरयाब जीलानी, सुन्नी वक्फ बोर्ड वकील
  • दुपारच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू
  • दुपारच्या सुट्टीनंतर मुस्लिम पक्षकार राजीव धवन बाजू मांडणार, दुपारच्या जेवणासाठी सुट्टी झाल्यामुळे न्यायालयाचे कामकाज थांबले.
  • दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची प्रत्येकी ४५ मिनीटांचा वेळ देण्यात आला आहे.
  • हिंदू आणि मुस्लिम पक्षातील वकिलांमधील वादामुळे रंजन गोगोई नाराज. म्हणाले, असे चालू राहीले तर आम्ही न्यायालयातून निघून जाऊ
  • हिंदू पक्षाने पुरावा म्हणून सादर केलेले पुस्तक" अयोध्या रिव्हिजिटेड' पुस्तकातील काही पानं मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी फाडली, न्यायालयाने मुस्लिम पक्षाचे वकिल राजीव धवन यांना खडसावले. कुणाल किशोर यांनी लिहलेल्या पुस्तकातील पुराव्यावर उत्तर देण्यास राजीव धवन यांनी नकार दिला. त्यांनी पुरावे म्हणून काही नकाशे सादर केले.
  • आत्ता बस झालं..कोणत्याही परिस्थितीत सुनावणी आज ५ वाजेपर्यं पुर्ण करणार - सरन्यायाधीश, हिंदू पक्षाला (इंटरव्हेशन पिटीशन) याचिका दाखल करण्यापासून न्यायालयाने रोखले. आजच दोन्ही बाजूंचे म्हणणे एकून सुनावणी पूर्ण करणार

सर्वोच्च न्यायालयामध्ये काल(मंगळवारी) सुनावणीचा ३९ वा दिवस होता. आज सुनावणीचा ४० वा दिवस शेवटचा ठरण्याची शक्यता आहे. सरन्यायाधींच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय खंडपीठ या प्रकरणी ६ ऑगस्टपासून सुनावणी घेत आहे. हिंदु-मुस्लीम दोन्ही पक्षकारांना आपआपली बाजू मांडण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

हेही वाचा - जम्मू काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक

काय आहे वाद?

वादातीत अयोध्या जागेची २.७७ एकर जागा राम लल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यामध्ये समान वाटून देण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० साली दिलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते. तेव्हापासून पुन्हा हा वाद तसाच आहे.

हेही वाचा - सोशल मीडियाशी 'आधार' लिंक करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर सुनावणीस नकार

सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी या प्रकरणावर निर्णय देण्याचा सरन्यायाधीशांचा प्रयत्न आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुर्ण करण्याचे आदेश सरन्यायाधिशांनी दिले होते. त्याच्या एक दिवस आधीच सुनावणी पुर्ण होत आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल लिहण्यास एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या वादाप्रकरणी अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीशांव्यतीरिक्त खंडपीठामध्ये न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस. ए नजीर सहभागी आहेत.

Intro:Body:

भिमा कोरेगाव हिंसाचार: सुधा भारद्वाज, फेरेरा, गोन्सालविस यांचा जामीन नाकारला

मुंबई - भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, अरुण फेरेरा, व्हेरनॉन गोन्सालविन्स यांना जामीन नाकारला आहे. उच्च न्यायलयाने जामीनाबाबतच्या सर्व याचिका नामंजूर केल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागील एक महिन्यापासून याप्रकरणी सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती सारंग कोतवळ यांनी याचिकेवर निर्णय दिला. न्यायालयाने ७ ऑक्टोबर पासून याचिकांवरील निर्णय राखून ठेवला होता. डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले होती. एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावमध्ये हिसांचार उफाळून आला, असा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.

तिघांना बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड विधानच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात पुणे जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधिशांनी तिघांना जामीन नाकारला होता. जमीन नाकारल्यानंतर तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अरुण फेरेरिया आणि व्हेरनॉन गोन्सालविस बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) संघटनेत भरती करत असल्याचा आरोप पुणे पोलीस आणि अतिरिक्त सरकारी वकील अरुणा पाय यांनी युक्तिवाद करताना केला आहे. तिघेही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) संघटनेशी संबधीत इतर संघटनांचे सदस्य आहेत, असा युक्तीवादही पुणे पोलिसांनी न्यायालयात केला आहे.  

Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.