नवी दिल्ली- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचाव करण्याचे आणि त्याचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आता संसदेत येणाऱ्या मंत्री आणि खासदारांना ही मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय समितीने मंत्री आणि खासदारांसाठी एक पत्रक जारी केले आहे.
तसेच संसदेच्या प्रत्येक सदस्याने संसदेत येताना आर एफ टॅग(रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी) वापरणे हे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कारण तोंडाला मास्क बांधल्याने व्यक्तीची ओळख पटवणे थोडे कठीण जाते. त्यामुळे संसदेच्या आवारात आणि संसदेत मास्क आणि आर एफ टॅग ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आला आहे.
संसदेत प्रवेश करताना खासदारांना आर एफ टॅग आणि ओळखपत्र दर्शवण्याची विनंतीही करण्यात आली आहे जेणे करून तोंडाला बांधलेल्या मास्कमुळे ओळख पटवणे कठीण बोणार नाही.
देशात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. याबाबत उपाययोजनावर गृहमंत्रालायची संसदीय समिती 19 ऑगस्टला आरोग्य मांत्रालयाच्या समितीसोबत विस्तृत चर्चा करणार असल्याचेही या पत्रकात म्हंटले आहे