नवी दिल्ली - सध्या सोशल मिडियावर एका महिलेचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबधीत महिला भाजपच्या कार्यालयात असून त्यांच्याकडे मदतीची याचना करत असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून भाजपवर टीका केली आहे.
-
कमल पर मतदान की सजा पाते हैं,
— MP Congress (@INCMP) October 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बैंकों के सामने बिलखते नज़र आते हैं।
—मोदी जी को वोट देने के बाद इस तरह का मंजर अब आम हो गया है, पता ही नहीं चला कब हाथ पर बजते-बजते ताली गाल पर बजने लगी।
मोदी जी,
देश की जनता का क़सूर सिर्फ़ इतना है कि ये आपके झूठे प्रचार से गुमराह हो गये। pic.twitter.com/beQLejCwed
">कमल पर मतदान की सजा पाते हैं,
— MP Congress (@INCMP) October 10, 2019
बैंकों के सामने बिलखते नज़र आते हैं।
—मोदी जी को वोट देने के बाद इस तरह का मंजर अब आम हो गया है, पता ही नहीं चला कब हाथ पर बजते-बजते ताली गाल पर बजने लगी।
मोदी जी,
देश की जनता का क़सूर सिर्फ़ इतना है कि ये आपके झूठे प्रचार से गुमराह हो गये। pic.twitter.com/beQLejCwedकमल पर मतदान की सजा पाते हैं,
— MP Congress (@INCMP) October 10, 2019
बैंकों के सामने बिलखते नज़र आते हैं।
—मोदी जी को वोट देने के बाद इस तरह का मंजर अब आम हो गया है, पता ही नहीं चला कब हाथ पर बजते-बजते ताली गाल पर बजने लगी।
मोदी जी,
देश की जनता का क़सूर सिर्फ़ इतना है कि ये आपके झूठे प्रचार से गुमराह हो गये। pic.twitter.com/beQLejCwed
संबधीत महिला पीएमसी बँकेची खातेदार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कटआउट्सच्या समोर उभा राहून ही महिला मोठ्याने रडत आहे. 'आम्ही मोदींना देव मानत होतो. म्हणून त्यांना मतदान केले. आता आम्ही लुटल्या गेलो आहोत. तुम्ही इतर देशांना मदत करता, आम्ही तुम्हाल मत दिली आहेत. आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. आम्हाला मदत करा, असे ती महिला म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
संबधीत महिलेचे नाव आणि ती कुठे राहते यासंबधीत माहिती अस्पष्ट आहे. हाथावर पडणारी टाळी कधी गालावर पडली हे लक्षातच नाही आले. मोदीजी जनतेची चूक फक्त एवढीच आहे की, ते तुमच्या खोट्या प्रचाराला बळी पडले, असे मध्यप्रदेश काँग्रेसने टि्वटमध्ये म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित 'पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँके'वर (पीएमसी) सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. पीएमसी बँकेच्या घोट्याळ्यामुळे बँकेचे ग्राहक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना बँकेतून फक्त २५ हजार रुपये काढता येतात. त्यामुळे उपचार, लग्न समारंभ इत्यादी कार्यासाठी लागणारा पैसा कोठून आणावा, असा बँकेच्या ग्राहकांना प्रश्न पडला आहे.