ETV Bharat / bharat

पुढील १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल - के. सिवन

चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला असला तरी पुढचे १४ दिवस लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल - इस्त्रो

author img

By

Published : Sep 8, 2019, 12:22 AM IST

विक्रम लँडर

नवी दिल्ली - चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला असला तरी पुढचे १४ दिवस लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले. दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

चंद्रापासून २ .१ किमी दूर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मात्र, चांद्रयान २ मोहीम ९० ते ९५ टक्के फत्ते झाल्याचे सरकारनेही म्हटले आहे. ऑर्बिटर चंद्राभोवती फिरतच असून त्याद्वारे चंद्राबद्दल वैज्ञानिक माहिती जाणून घेण्यास मदत होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

या मोहीमेचा इतर मोहीमांवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सिवान यांनी सांगितले. चांद्रयान मोहिमेनंतर आम्ही गगनयान मोहीमेमध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिवान यांनी सांगितले. शेवटच्या टप्प्यात कार्यप्रणालीमध्ये दोष निर्माण झाल्याचे संपर्क तुटल्याचे ते म्हणाले. या आधी तांत्रिक माहिती जमा करत असल्याचे इस्त्रोने स्पष्ट केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत, असे सिवन यांनी मुलाखतीत सांगितले. आम्ही अजूनही आशा सोडली नाही, असे सिवन म्हणाले.

Intro:Body:

NAT

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.