शिमला - कोरोनाच्या प्रादुर्भावातून सध्या कोणीही सुटलेले नाही, यामुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. या रगाला आळा घालण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी आहे. लोक आपापल्या घरात बसून आहेत. कारखाने, उद्योग, व्यवसाय, सरकारी, खासगी अस्थापने बंद आहेत. परिणामी रस्त्यावर रहदारी कमी आहे, त्यामुळे वायू, ध्वनी प्रदूषण कमी झाले आहे. या लॉकडाऊनचा फायदा निसर्गसंपत्तीला होत आहे. वातावरणातील प्रदूषण कमी होत आहे. लोक घराबाहेर पडत नसल्याने निसर्गाचा ऱ्हास थांबला आहे. हिमाचल प्रदेशातील व्यास नदीचे प्रदूषण कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
कुल्लू जिल्ह्यातील व्यास कुंडातून वाहणारी व्यास नदी पूर्वीपेक्षा जास्त स्वच्छ व सुंदर दिसत आहे. साधारण 470 किलोमीटर लांबीची व्यास नदी कुल्लू, मंडी, हमीरपूर, कांगड़ा जिल्ह्यातून वाहते. शेवटी व्यास नदीचा पंजाब येथे सतलज नदीमध्ये संगम होतो. व्यास नदीच्या किनारी मनाली, कुल्लू, मंडी, सुजानपुट टिहरा यांसह अनेक शहरे आहेत. पण, काही लोकांमुळे व्यास नदीचे प्रदूषण होत होते. पण, संचारबंदीमुळे प्रदूषण कमी झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या संचारबंदीचा फायदा अप्रत्यक्षरित्या निसर्गाला होत आहे. यामुळे वातावरणातही शुद्ध हवा वाहत आहे.
हेही वाचा - १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी..