ETV Bharat / bharat

VIDEO : "शरण ये..."; दहशतवादी मुलाला वाचवण्यासाठी बापाची आर्जवं... - शरण ये म्हणून बापाची विनवणी

काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामधील एक दहशतवादी काश्मीरचा तरुण होता. चकमकीपूर्वी त्याचे वडील त्याला शरण येण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकण्यास त्याने नकार दिला, ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले....

Watch: Father appeals his militant son to surrender
VIDEO : "शरण ये..."; दहशतवादी मुलाला वाचवण्यासाठी बापाची आर्जवं...
author img

By

Published : Jul 5, 2020, 8:50 PM IST

श्रीनगर : काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामधील एक दहशतवादी काश्मीरचा तरुण होता. चकमकीपूर्वी त्याचे वडील त्याला शरण येण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकण्यास त्याने नकार दिला, ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले. हिलाल अहमद असे या तरुणाचे नाव होते. तो काही दिवसांपूर्वीच हिजबुलमध्ये सहभागी झाला होता.

या वडिलांची आर्जवे कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे. यामध्ये हिलालचे वडील त्याला अनेकवेळा शरण येण्यासाठी विनंती करत आहेत. "हिलाल, मी तुझा बाप आहे. हे साहेब (लष्करी अधिकारी) माझ्यासोबतच आहेत. जर तू आमचे ऐकलेस तर तुला काहीही होणार नाही, आणि मी तुला वाचवू शकेल." असे ते वारंवार त्याला सांगत होते.

VIDEO : "शरण ये..."; दहशतवादी मुलाला वाचवण्यासाठी बापाची आर्जवं...

एक लष्करी अधिकारीही हिलालच्या वडिलांना सांगत आहे, की तुमच्या मुलाला त्याचे हात वर करुन खाली येण्यास सांगा, आम्ही त्याला कोणतीही इजा पोहचवणार नाही. तसेच, व्हिडिओच्या शेवटी हिलालची आईही त्याला शरण येण्याची विनवणी करताना दिसत आहे. मात्र पलीकडून कोणताही प्रतिसाद येत नाही.

या सर्व प्रयत्नांनंतरही दहशतवाद्यांकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. लष्कराने शरण येण्यासाठी संधी देऊनही, या दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात हिलालसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तसेच, लष्कराचा एक जवानही जखमी झाला.

हेही वाचा : घातपात टळला...नक्षलवाद्यांनी पुरलेला 4 किलोचा आयईडी बॉम्ब निकामी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.