पाटणा - बिहारमध्ये जमुई, औरंगाबाद, गया आणि नवादा या ४ लोकसभा जागांसाठी मतदान सुरू आहे. ७ हजार ४८६ मतदान केंद्रे बनवण्यात आली असून ४ जागांसाठी एकूण ४४ उमेदवार मैदानात आहेत. येथे औरंगाबादमधील बूथ क्रमांक ९ बाहेर आयईडी बॉम्ब सापडला. हा बॉम्ब निकामी करण्यात आला. याशिवाय गयातील डुमरिया येथे शहरी भागातही कॅनमध्ये बॉम्ब सापडला. हाही निकामी करण्यात आला.
बिहार सरकारचे कृषि मंत्री डॉ. प्रेम कुमार यांनी गया येथील स्वराज पुरी रोडवरील मतदान केंद्रावर सायकलने पोहोचत मतदान केले. लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात आज साधारण ७१ लाख मतदार ४४ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करतील.