तिरुवअंनतपुरम- केरळमधील पाला विधानसभा मतदारसंघात पोटनिडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील १७० पोलिंग बूथवर लोकांकडून आपला मतदानाचा हक्क बजावला जात आहे. आज सकाळपासूनच मतदानासाठी लोकांच्या रांगा पाहावयास मिळात आहेत. दरम्यान मातदानात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केली होती.
आज सकाळी ७ ते रात्री ६ वाजेपर्यंत सदर मतदारसंघातील नागरिकांना मतदान करता येणार आहे. या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी १३ उमेदवार रिंगणात उभे आहे. या मतदारसंघात एकून १ लाख ७९ हजार १०७ मतदार असून त्यापैकी ८७ हजार ७२९ हे पुरूष मतदार आहे. तर ९१ हजार ३७८ हे महिला मतदार आहे.
दरम्यान, एलडीएफ पक्षाचे उमेदवार मनी सी कप्पन यांनी सकाळीच जाऊन कन्नाटुपारा सरकारी तंत्रविद्यानिकेतन कॉलेजमध्ये बूथ नं ११९ वर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी एलीस, मुलगी टिना आणि दिपा हे तिघेही उपस्थित होते. त्याचबरोबर, युडीएफ पक्षाचे जोस टॉम यांनी देखील मतदान केले.
हेही वाचा- 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'.. संपूर्ण ह्युस्टन मोदीमय !
केरला काँग्रेस (म) चे नेते के.एम.मनी हे पाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी ५ दशक या मतदारसंघात आपली सत्ता गाजवली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर केरळमधील सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी व विरोधी पक्ष संयुक्त लोकशाही आघाडी यांच्यामध्ये पाला मतदारसंघ जिकण्यासाठी चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीत भाजप प्रणेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी उतरल्याने ही लढत तिहेरी झाली आहे. दरम्यान २७ सप्टेंबर रोजी मतमोजनीला सुरुवात होणार.