नवी दिल्ली - अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का गर्भवती असून याबाबत विराटने ट्विट करत माहिती दिली आहे.
-
And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏 pic.twitter.com/0BDSogBM1n
— Virat Kohli (@imVkohli) August 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏 pic.twitter.com/0BDSogBM1n
— Virat Kohli (@imVkohli) August 27, 2020And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏 pic.twitter.com/0BDSogBM1n
— Virat Kohli (@imVkohli) August 27, 2020
आता आम्ही दोघांचे तीन होणार असून तिसरा जानेवारी २०२१मध्ये येणार असल्याचे त्यानी ट्विटवरून सांगितले आहे. विराट-अनुष्काने ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाळाच्या आगमनाची बातमी मिळाल्यामुळे दोघांनाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने शेअर केलेल्या दोघांच्या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बम्प दिसून येत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा विवाह ११ डिसेंबर २०१७मध्ये इटलीमध्ये झाला होता. एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघे प्रेमात पडले होते. बराच काळ डेटिंग केल्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. विवाहानंतर दोघेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
विराट कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)साठी यूएईमध्ये आहे, तर अनुष्का मुंबईत आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरूचे नेतृत्व विराट कोहली करतोय.