लखनऊ - पोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबेने त्याच्या राहत्या गावात आठ पोलिसांना मागील महिन्यात गोळ्या घालून ठार मारले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीला आणखी चार आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही समिती उत्तर प्रदेश सरकारने 11 जुलैला नेमली होती. यात राज्याचे अतिरिक्त सचिव संजय भुसारेड्डी, एडीजी हरी राम.शर्मा आणि डीआयजी जे रवींद्र गोर यांचा समावेश आहे.
या समितीला 31 जुलै पर्यंत वेळ दिला होता. तो आता चार आठवड्याने वाढवून 31 आँगस्ट करण्यात आला आहे.