ETV Bharat / bharat

राहुल गांधी म्हणाले ..मी एकटाच जातो! श्रीनगर विमानतळावरचा व्हिडिओ केला शेअर - राहुल गांधीं

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.

राहुल गांधी
author img

By

Published : Aug 25, 2019, 9:25 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, काश्मीर प्रशासनाने त्यांना परत पाठवले. श्रीनगर विमानतळावर थांबवण्यात आल्यानंतर काश्मीर प्रशासनासोबत चर्चा करतानाचा व्हिडिओ राहुल गांधींनी टि्वटरवर शेअर केला आहे.

  • It's been 20 days since the people of Jammu & Kashmir had their freedom & civil liberties curtailed. Leaders of the Opposition & the Press got a taste of the draconian administration & brute force unleashed on the people of J&K when we tried to visit Srinagar yesterday. pic.twitter.com/PLwakJM5W5

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

श्रीनगर विमानतळावर थांबवण्यात आल्यानंतर राहुल गांधी काश्मीरी अधिकाऱयांशी बातचीत करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 'मला राज्यापालांनी काश्मीरमध्ये येण्याचे आंमत्रण दिले होते. आता मी आलो आहे. तर मला थांबवण्यात येत आहे. जर काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे तर आम्हाला थांबवण्यात का येत आहे. आम्हाला फक्त काश्मीरमधील नागरिकांना भेटून तेथील परिस्थिती जाणून घ्यायची आहे. जर राज्यात कलम 144 लागू आहे. तर मी एकटा जातो, असे ते अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात येत असून विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी पक्षाच्या शिष्ठमंडळामुळे काश्मीरमध्ये लागू असलेल्या संचारबंदीचेही उल्लंघन होईल, असे जम्मू प्रशासनाने म्हटले.

राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन, आरजेडीचे मनोज झा ही ज्येष्ठ नेते मंडळी होती.

जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला, अशी टीका केली होती.

तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देऊ. आम्हाला तुमच्या विमानाची गरज लागणार नाही. मात्र, कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि काश्मीरमधील लोक, तेथील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा, असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांना दिले होते.

Intro:Body:

article 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.