ETV Bharat / bharat

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू करणार 'एलिमेंट्स' या भारतीय सोशल मीडिया अ‌ॅपचे उद्घाटन - एलिमेंट्स' या सोशल मीडिया अ‌ॅप

श्री श्री रविशंकर यांच्यापासून प्रेरणा घेत 1 हजारपेक्षा जास्त आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येत हे अ‌ॅप डेव्हलप केले आहे. या सोशल मीडिया अ‌ॅपद्वारे चॅटिंग तसेच व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. तसचे युझरला आपली प्रोेफाईल तयार करता येणार आहे.

एलिमेंटस अ‌ॅप
एलिमेंटस अ‌ॅप
author img

By

Published : Jul 5, 2020, 12:42 PM IST

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आर्ट ऑफ लव्हिंग फाऊंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत 'एलिमेंट्स' या भारतीय बनावटीच्या सोशल मीडिया अ‌ॅपचे उद्घाटन करणार आहेत. श्री श्री रविशंकर यांच्यापासून प्रेरणा घेत 1 हजारपेक्षा जास्त आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येत हे अ‌ॅप डेव्हलप केले आहे.

अ‌ॅप उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव, राज्यसभा खासदार ए. आर. रेड्डी, माजी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू, कर्नाटकाचे माजी महसूल मंत्री आर. व्ही. देशपांडे, हिंदुजा कंपनीचे संचालक अशोक हिंदुजा, जीएम ग्रुपचे संस्थापक जी. एम राव, जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रमुख सज्जन जिंदाल आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार आहेत.

हे अ‌ॅप गुगल अ‌ॅप स्टोअरसह इतरही सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया अ‌ॅपमध्येजे फिचर आहेत. ते सर्व फिचर एलिमेंट्स या अ‌ॅपमध्ये आहेत.

काय आहेत. फिचर

या सोशल मीडिया अ‌ॅपद्वारे चॅटिंग तसेच व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे.

युझरला प्रोफाईल तयार करता येणार असून आपल्या मित्रमैत्रिणी आणि आवडीनिवडीनुसार इतरांना फॉलो करता येणार आहे.

हे अ‌ॅप आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.