ETV Bharat / bharat

निजामुद्दीन मरकज, तबलिघी जमातवर बंदी घाला - विश्व हिंदू परिषद

author img

By

Published : Apr 5, 2020, 7:45 PM IST

तबलिघी जमातमुळे सर्व भारतीयांचे प्राण धोक्यात आले आहेत. अशा लोकांची बँक खाती, कार्यालये शोधून काढून त्यांची सगळी आर्थिक पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. त्यांच्या कारवाया ताबडतोब थांबवल्या गेल्या पाहिजेत.

Vishwa Hindu Parishad
Vishwa Hindu Parishad

नवी दिल्ली - तबलिघी जमात आणि निजामुद्दीन मरकजवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख सहसचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनी निवेदनाद्वारे मरकजवर जोरदार टीका केली आहे.

तबलिघी जमात आणि निजामुद्दीन मरकज यांच्या देशव्यापी गुन्हेगारी कृत्यांमुळे संपूर्ण भारत आज गंभीर संकटात सापडला आहे. या प्रकाराला इस्लामिक कट्टरपंथीयता आणि दहशतवादाला पोषक कृत्य, असे म्हणत विश्व हिंदू परिषदेने यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.

तबलिघी जमातमुळे सर्व भारतीयांचे प्राण धोक्यात आले आहेत. अशा लोकांची बँक खाती, कार्यालये शोधून काढून त्यांची सगळी आर्थिक पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. त्यांच्या कारवाया ताबडतोब थांबवल्या गेल्या पाहिजेत.

देश लॉकडाऊन करून कोरोना विषाणूला थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केल्यानंतर संपूर्ण देश सुटकेचा नि: श्वास टाकत होता. त्यावेळेस कोरोना आकडा केवळ 2.8 टक्‍क्‍यांनी वाढत होता. त्यानंतर अचानक 30 मार्चला भीषण विस्फोट म्हणावा तसा प्रकार निजामुद्दीन मरकज येथे घडला. त्या ठिकाणी एकूण 2301 लोक होते, त्या सर्वांना तिथून बाहेर काढण्यात आले यापैकी पाचशे जण पॉझिटिव्ह होते आणि आठशे जणांना करण्याची आवश्यकता होती. यानंतर 31 ऑगस्टला अचानकपणे कोरोनाचे रुग्णवाढीचा दर 43.02 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला. यामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये लपलेल्या भारतीय आणि परदेशी कोरोनाबाधित रुग्णांना ताबडतोब ताब्यात घेणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यामुळे या जीवघेण्या विषाणूचा देशभरात समूह संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे जैन म्हणाले.

इतका भयंकर गुन्हा केल्यानंतरही या कट्टरतावाद्यांना त्याचं काहीही दु: ख नाही. उलट त्यांचे मौलवी या कोरोना बॉम्ब बनलेल्या लोकांना लपून ठेवत आहेत आणि वाचवत आहेत. त्यांना पकडायला गेलेल्या पोलिसांना आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देशातील अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे.

डॉक्टर या कोरोनाबाधित मौलवींचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावरही हल्ले झाले. क्वारंटाईन केलेल्या तबलिघींनी रुग्णालयांमध्ये परिचारिकांसोबत अत्यंत किळसवाणी आणि अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली. तसेच डॉक्टरांवरही थुकण्यास सुरुवात केली. नरेला येथील टाईम सेंटरमध्ये लष्करातील डॉक्टर आणि सैनिकांनाही बोलवण्यात आले. केवळ निजामुद्दीन नव्हे तर देशभरातील मौलवींनी मुस्लीम समाजाला भडकवणारी भाषणे देण्यास सुरुवात केली आहे. बंगालमधील मौलवी अब्बस सिद्दीकी याने नमाजाला येणाऱ्या मुस्लिमांना भडकवले आणि अल्लाह अशा प्रकारचा विषाणू पाठवेल, ज्याने 500 दशलक्ष हिंदू मारले जातील, असे बोलण्यापर्यंत त्याची मजल गेली, असे ते म्हणाले.

'सध्या देशात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींपैकी अर्ध्याहून अधिक तबलिघी, मौलवी आणि त्यांच्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्ती आहेत. तबलिघींच्या आणि त्यांच्या मनावर अशा प्रकारच्या गोष्टी बिंबवणाऱ्या कट्टरतावादी लोकांचे अमानवी वर्तन पाहून संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. या लोकांबद्दल संपूर्ण देशवासियांच्या मनात तिरस्कार दाटून आला आहे. या लोकांना covid-19 हे एक हत्यार वाटत असून इथल्या लोकांना त्याची मोठ्या प्रमाणात लागण करण्यात त्यांची स्पर्धा लागली आहे, असे चित्र आहे,' असे जैन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.