देहराडून - उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात पिकअप वाहन काली नदीच्या दरीत कोसळले. या पीकअपमध्ये १८ जण असल्याची माहिती मिळत आहे. यातील चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.
हेही वाचा - जपानमध्ये हाजिबीस टायफूनच्या तडाख्यात २५ मृत्युमुखी; मोदींकडून शोक व्यक्त
ही घटना चमोली जिल्ह्यात देवाल घेस मार्गावर झाली. भाविकांनी भरलेले पिकअप वनाल या ठिकाणाहून देवालकडे जात असताना हा अपघात झाला. गाडी अनियंत्रित झाल्याने खोल दरीमध्ये कोसळले. अपघाताची माहिती मिळताच थराली येथून बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - निर्भया प्रकरणी धक्कादायक खुलासा! त्या क्रुर रात्रीची कहानी सांगण्यासाठी मित्रानेच उकळले लाखो रुपये
चमोलीच्या जिल्हाधिकारी स्वाती भदौरिया यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच त्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना थराली येथील सरकरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर २ गंभीर व्यक्तींना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.