ETV Bharat / bharat

वाराणसीच्या प्रसिद्ध संदेश प्रजातीच्या वांग्याला आखाती देशात पंसती - वाराणसी लेटेस्ट न्यूज

वाराणसीच्या संदेश प्रजातीच्या वांग्याला विदेशातून मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. 8 नोव्हेंबरला तब्बल 30 क्विंटल वांग्याची निर्यात अखाती देशात होणार आहे. वांग्यासोबतच हिरवी मिरची आणि इतर भाजीपाल्यांची निर्यात देखील आखाती देशात करण्यात येते.

varanasi brinjal news
वाराणसीच्या वांग्याला विदेशातून मागणी
author img

By

Published : Nov 7, 2020, 6:43 PM IST

वाराणसी - वाराणसीच्या संदेश प्रजातीच्या वांग्याला विदेशातून मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. 8 नोव्हेंबरला तब्बल 30 क्विंटल वांग्याची निर्यात अखाती देशात होणार आहे. वांग्यासोबतच हिरवी मिरची आणि इतर भाजीपाल्यांची निर्यात देखील आखाती देशात करण्यात येते.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. वाराणसी परिसरात उभारण्यात आलेल्या कार्गो सेंटरचा उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. कार्गो सेंटरमुळे आपला भाजीपाला विदेशात पाठवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होत असून, विदेशात भारतीय भाजीपाल्याला चांगला दर मिळत आहे. या पूर्वी 22 ऑक्टोबरला येथून तब्बल 30 क्विंटल हिरवी मिर्ची आखाती देशात विक्रीसाठी पाठवण्यात आली होती आणि आता रविवारी 30 क्विंटल वांगी आखाती देशात पाठवण्यात येणार आहेत. भारतातून निर्यात होणाऱ्या शेतीमालाला दुबई, ओमान, जर्मनी, कतार या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.