नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (गुरुवारी) सकाळी नवी दिल्ली ते वैष्णवदेवी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. नवरात्र उत्सवानिमित्ताने काश्मीरवासीयांना वंदे भारत एक्सप्रेस भेट दिल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. तसेच या एक्सप्रेसमुळे काश्मीरमधील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
-
जम्मू के लोगों के लिए नवरात्रि पर विशेष भेंट। अत्याधुनिक सुविधाओं वाली, भारत में ही निर्मित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ से भक्त अब सिर्फ 8 घंटे में दिल्ली से कटरा पहुंचेंगे। इससे जहां जम्मू-कश्मीर के पर्यटन को बढ़ावा मिलेगा, वहीं श्रद्धालुओं की यात्रा भी आरामदायक होगी। जय माता दी! pic.twitter.com/hf0X6sA5Xj
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">जम्मू के लोगों के लिए नवरात्रि पर विशेष भेंट। अत्याधुनिक सुविधाओं वाली, भारत में ही निर्मित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ से भक्त अब सिर्फ 8 घंटे में दिल्ली से कटरा पहुंचेंगे। इससे जहां जम्मू-कश्मीर के पर्यटन को बढ़ावा मिलेगा, वहीं श्रद्धालुओं की यात्रा भी आरामदायक होगी। जय माता दी! pic.twitter.com/hf0X6sA5Xj
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2019जम्मू के लोगों के लिए नवरात्रि पर विशेष भेंट। अत्याधुनिक सुविधाओं वाली, भारत में ही निर्मित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ से भक्त अब सिर्फ 8 घंटे में दिल्ली से कटरा पहुंचेंगे। इससे जहां जम्मू-कश्मीर के पर्यटन को बढ़ावा मिलेगा, वहीं श्रद्धालुओं की यात्रा भी आरामदायक होगी। जय माता दी! pic.twitter.com/hf0X6sA5Xj
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2019
आत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली वंदे भारत एक्सप्रेस आता फक्त ८ तासांमध्ये दिल्लीवरुन कटाला येथे पोहचेलं. त्यामुळे काश्मीरमधील पर्यटनाला चालना मिळणार असून भाविकांनाही आरामामध्ये प्रवास करता येणार आहे. जम्मूमधील लोकांना ही नवरात्रीची भेट असल्याचे ट्विट मोदींनी केले आहे. या रेल्वेचे कमीतकमी तिकीट १ हजार ६३० रुपये असून जास्तीत जास्त तिकीट ३ हजार १४ रुपये आहे.
हेही वाच - दिल्ली ते वैष्णवदेवी धावणार वंदे भारत एक्सप्रेस, अमित शहांनी दाखवला हिरवा झेंडा
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेल्या सुविधा
- संपुर्ण रेल्वेमध्ये सीसीटीव्ही
- जीपीएस सुविधा
- वाया फाय( इंटरनेट) सुविधा
- बायो शौचालये
- रेल्वे संपूर्ण भारतीय बनावटीची आहे.
हेही वाच - पंतप्रधान मोदींचे भाषण दाखवले नाही म्हणून दूरदर्शनच्या अधिकाऱ्याचे निलंबन...
नवी दिल्ली ते काश्मीरमधील कटरा पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही रेल्वे सकाळी ६ वाजता दिल्ली येथून सुटणार असून दुपारी २ वाजता कटरा येथे पोहचणार आहे. तर दुपारी ३ वाजता कटरा येथून माघारी दिल्लीला रात्री ११ वाजता पोहचेल. वंदे भारत एक्सप्रेसमुळे दिल्ली वैष्णवदेवी अंतर ४ तासांनी कमी झाले आहे.