ETV Bharat / bharat

'व्हॅलेंटाईन डे' विशेष - दशरथ मांझी; जगाला खरं प्रेम शिकवणारा 'माऊंटन मॅन'

बिहारच्या गया येथील वजीरगंजच्या गेहलौर घाटी येथील दशरथ मांझीने सतत २२ वर्ष डोंगराची छाती फोडून रस्ता बनवला. ही गोष्ट ऐकायला सोपी वाटते पण फक्त प्रेमापोटी मांझीनं हे करून दाखवलं. त्यामुळेच डोंगर फोडून बनवलेल्या रस्त्याला 'प्रेमपथ' (प्रेमाचा मार्ग) असं नाव देण्यात आलं आहे.

mounatin man dasharath manzi
जगाला खरं प्रेम शिकवणारा 'माऊंटन मॅन'
author img

By

Published : Feb 14, 2020, 4:04 AM IST

'व्हॅलेंटाईन डे' म्हटलं की प्रेमाचा दिवस. जेव्हा कधी प्रेमाचं नाव निघेल तेव्हा 'माऊंटन मॅन' दशरथ मांझीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या दिवसानिमित्त दशरथ मांझी यांच्या आयुष्यावरील 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.

मांझीच्या प्रेमात संघर्ष, जिद्द आणि पागलपण दिसते. दशरथ मांझी हे नाव नाही तर प्रेमाचे प्रतिक बनले आहे. एखाद्या व्यक्तीवर आपण किती प्रेम करू शकतो, याचं उदाहरण मांझीनं जगासमोर ठेवलं आहे. आपलं प्रेम गमावल्यावर लोक वेगळाच विचार करतात इतकंच काय तर आत्महत्येचाही विचार करतात. मात्र, दशरथ मांझीनं आपल्या प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. खरं प्रेम आणि जिद्द याची नवी व्याख्याच मांझीनं आपल्यासमोर ठेवली आहे.

बिहारच्या गया येथील वजीरगंजच्या गेहलोर घाटी येथील दशरथ मांझीने सतत २२ वर्ष डोंगराची छाती फोडून रस्ता बनवला. ही गोष्ट ऐकायला सोपी वाटते पण फक्त प्रेमापोटी मांझीनं हे करून दाखवलं. त्यामुळेच डोंगर फोडून बनवलेल्या रस्त्याला 'प्रेमपथ' (प्रेमाचा मार्ग) असं नाव देण्यात आलं आहे. आपण सर्वांनीच प्रेमाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. मात्र, मांझीचं प्रेम अनोखं आणि प्रचंड ताकदवान वाटतं. मांझीच्या प्रेमात दु:ख नाही, वेदना नाहीत, आहे तो केवळ निरागस भाव. आपल्या प्रिय व्यक्तीसाठीची अपार जिद्द. त्यामुळेच मांझीनं बनवलेला रस्ता आज अनेक पिढ्यांसाठी मोठं प्रतिक बनला आहे.

'व्हॅलेंटाईन डे' विशेष; पाहा दशरथ मांझीवरील ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

मांझी यांचे पुत्र भागिरथी मांझी यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. 'दशरथ मांझी यांचा बालविवाह झाला होता. गावातील एका जमीनदार व्यक्तीकडे दशरथ कामाला होते त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यानंतर डोंगराच्या त्याबाजूने कामाला होते. त्यांची पत्नी फगुनिया दररोज त्यांच्यासाठी जेवण घेऊन जात असे. एकेदिवशी जेवण घेऊन जाताना फगुनियाचा तोल गेला आणि ती डोंगरावरून खाली कोसळली. यानंतर काही दिवसांनी तिचं निधन झालं. तेंव्हा मी दहा वर्षांचा होता', असे भागरथी यांनी सांगितले. या घटनेनंतर दशरथ मांझी अनेक दिवस कामावर गेले नाहीत. ते विचार करायचे डोंगराऐवजी जर याठिकाणी रस्ता असता तर माझी पत्नी सहजरित्या माझ्यासाठी जेवण आणू शकली असती. शहर आणि रुग्णालयात जाणंही सहज झालं असतं. बस्स...यानंतरच त्यांनी डोंगर तोडण्याचा निर्णय घेतला, असेही भागिरथी यांनी सांगितले.

मांझी यांनी १९६० ते १९८२ पर्यंत तब्बल २२ वर्ष कठोर मेहनत घेऊन २५ फूट उंच, ३० फूट रुंद आणि ३६० मीटर लांबीचा डोंगर तोडून रस्ता बनवला. लोक त्यावेळी दशरथ यांना पागल म्हणायचे. मात्र, पत्नीच्या प्रेमासाठी त्यांनी हे कठोर काम पूर्ण केले.

'मांझी - द माऊंटन मॅन' -

2015 साली आलेला केतन मेहता दिग्दर्शित हा चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. या चित्रपटानंतरच दशरथ मांझीच्या कर्त्वुत्वाचा परिचय बहुतांश लोकांना झाला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी या चित्रपटात दशरथ मांझी यांची भूमिका निभावली होती तर मांझींच्या पत्नी फगुनिया यांचा रोल अभिनेत्री राधिका आपटे यांनी केला होता. या चित्रपटाचे चित्रिकरण ८५ टक्के त्यांच्या गावीच झाले आहे.

पायी गाठली होती दिल्ली -

डोंगर पुरूष दशरथ यांनी १९७२ साली रेल्वेरूळाच्या कडेकडेने पायी चालत दिल्ली गाठली होती. त्यांना हे अंतर पार करायला २ महिने लागले होते. बिहारचे नेता रामसुंदर दास यांची भेट घेऊन ते पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. लोकांना येण्याजाण्यासाठी रस्ता व्हावा, ही मागणी करण्यासाठी मांझी दिल्लीला गेले होते, अशी माहिती ग्रामस्थ अभिनंदन पासवान यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. यानंतर नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मांझी यांची समाधी, रुग्णालय आणि सडक बनवली होती.

आजपर्यंत अनेकांनी प्रेमाच्या अनेक व्याख्या केल्या आहेत. प्रत्येकानुरूप ती व्याख्या बदलत किंवा समृद्ध होत गेली आहे. मात्र, दशरथ मांझी यांनी प्रेमाची एक आगळी-वेगळी व्याख्या करत प्रेमाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले आहे. एखाद्या गोष्टीवर किती निस्वार्थ आणि जिद्दीने प्रेम करता येऊ शकते, याचं उदाहरण मांझींनी जगासमोर ठेवलं आहे. आज 'व्हॅलेंटाईन डे' निमित्तानं दशरथ मांझी या साध्या सरळ माणसाला सर्वांनी एकदा आठवून पाहायला हवं.

तोडलेला डोंगर आणि बनलेला प्रेमपथ आजही दशरथ मांझींच्या प्रेमाची साक्ष देतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.