उत्तराखंड (उत्तरकाशी) - राज्यातील उत्तरकाशीमध्ये असणाऱ्या मोरी या विकासखंडात पायाभूत सुविधांची वानवा असल्याने, येथील नागरिकांना अतिशय हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. काही ठिकाणी नद्यांवर पूलाची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना नदी पार करण्यासाठी दोर वापरावे लागत आहे.
स्वतंत्र भारताच्या 73 वर्षांनंतरही या भागातील लोकांना मुलभूत सोईसुविधा मिळताना दिसत नाही
मोरी विकासखंड भागातील नद्यांच्या पाण्याचा प्रवाह हा अतिशय जोरदार असतो. वेगवान प्रवाहामुळे आणि नदीच्या विस्तारीत पात्रामुळे येथील नागरिकांना नदीत उतरता येत नाही. या ठिकाणी नद्यांवर पूल अथवा इतर कोणतीही पर्यायी सोय नसल्याने रोजच्या कामांची तड लावण्यासाठी रहिवाशांना दोरीच्या मदतीने आपला जीव धोक्यात घालून नद्या ओलांडाव्या लागत आहे.
गोविंद वन्यजीव पशु अभयारण्य, सिर्गा या भागातील रहिवासी रोज दोरीच्या सहाय्याने नदी ओलांडत आहेत. गावात दवाखान्याची सोय नसल्याने काही वेळा आजारी व्यक्तीस इतर ठिकाणी घेवून जाणे अशावेळा खूप धोकादायक असते. गावातील लोक रोजच्या रोज असा प्रवास करत असल्याने हे सोपे वाटत असले, तरी रूग्णास रुग्णालयात पोहचण्यासाठी त्यांना अगोदर स्वतःचा जीव धोक्यात घालावे लागत आहे.
उत्तर काशीमधील अशा अनेक विकासखंडातील बहुतेक गावे अद्यापही अशा धोकादायक पद्धतीने जीवन जगत आहेत पण स्थानिक वनविभाग त्याकडे लक्ष देत नाही ना प्रशासनातील उच्च अधिकारी याची दखल घेत नाहीत आहेत, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.