लखनऊ - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझरची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग त्रास झाला असताना सॅनिटायझर्सची मागणी वाढली होती. या राज्यांना उत्तर प्रदेशमधून सॅनिटायझर्स पाठवण्यात आले.
उत्तर प्रदेशने राज्यात 1 कोटी 76 लाख 66 हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन करून इतिहास रचला आहे. राज्यातील एकूण उत्पादन क्षमता दिवसाला 6 लाख लिटरपेक्षा जास्त आहे. राज्यातील विविध ठिकाणांहून सॅनिटायझर्सची 1 कोटी 60 लाख 7 हजार 600 पॅकिंग बाजारात पुरविली गेली आहेत. सध्या, एकूण 51 लाख 88 हजार 260 पॅकिंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
हेही वाचा - गुजरात दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आरोग्य वनाचे उद्घाटन
कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझरचे उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अनेक कंपन्यांना सॅनिटायझर बनविण्याचा परवाना दिला. उत्तर प्रदेशात साखर कारखाने, डिस्टिलरीज, सॅनिटायझर कंपन्या आणि इतर संस्था सॅनिटायझर तयार करतात.
उत्तर प्रदेश निर्मित सॅनिटायझर जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र यासारख्या अनेक राज्यांत पाठवले जात आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला मोफत सॅनिटायझरही पुरविले जात आहे.
हेही वाचा - मनाली ते केलांग मार्गावर धावणार विद्युतबस