अलवार - आयुष्य जेव्हा पार संपलं असं वाटतं तेव्हा ते पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी जीवनाच्या एका खडतर मार्गावरून जावं लागतं, त्या मार्गावर जागोजागी काटे पेरलेले आहेत आणि त्यावरून चालताना पावलांना होणाऱ्या जखमा भयंकर असतात. नियतीने समोर काहीही ठेवले असले तरी स्वतःच्या कष्टाने त्यावर मात करता येते याचे उदाहरण राजस्थानच्या उषा चौमार यांनी समाजासमोर ठेवले आहे.
स्वतःसोबत इतर महिलांच्या आयुष्यतही त्यांनी आशेचा दीप लावला असून त्यांना भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताबाने गौरवले आहे. समस्या आणि आव्हानापासून कधीच पळ न काढता त्यांचा सामना करावा, असा संदेश त्यांनी महिलांना दिला आहे.
उषा यांनी दोन प्रकारचे आयुष्य जगले आहे. वयाच्या ७ व्या वर्षांपासून त्या मैला उचलणाचे काम करत. वयाच्या 14 व्यावर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र, लग्नानंतरही त्याना मैला उचलण्याचेच काम करावे लागत. या कामाला प्रतिष्ठा होती ना सन्मान, तसेच्या त्यांना मदिरांतही प्रवेश दिला जात नसे. हे सर्व त्यांच्या लक्षात येते होते, पण त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.
मात्र, 2003 मध्ये त्याच्या आयुष्याने वळण घेतले. उषा यांनी सुलभ शौचालय संस्थेशी त्यांनी संपर्क साधला आणि काम सुरु केले. त्याने फक्त त्यांचेच नाही तर त्यांच्यासह इतर 150 महिलांचे आयुष्य बदलले. सध्या त्या सुलभ शौचालय संस्थेच्या अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजागर निर्माण करुन दिला आहे.