ETV Bharat / bharat

लडाखमधील भारत-चीन सीमावादावर अमेरिकेचं बारीक लक्ष

author img

By

Published : Oct 24, 2020, 7:37 PM IST

आशिया खंडात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी अमेरिकेने भारताशी जवळीक साधली आहे. २७ ऑक्टोबरला भारत आणि अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी महत्त्वाची चर्चा होणार आहे. परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री स्तरावरील ही बैठक होणार असून २+२ मंत्री स्तरावरील बैठक असे नाव यास देण्यात आले आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन डी. सी - यावर्षी मे महिन्यापासून भारत चीनमध्ये सीमारेषेवरून वाद सुरू झाला आहे. यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. दोन्ही देशांनी लडाखजवळील सीमेवर अतरिक्त सैन्य तैनात केले असून शस्त्रसज्जता ठेवली आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून तयारी सुरू आहे. मात्र, या परिस्थितीवर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीमेवरील स्थिती आणखी चिघळू नये, अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चीनच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी भारताशी जवळीक

२७ ऑक्टोबरला भारत आणि अमेरिकेत वरिष्ठ स्तरावर राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी महत्त्वाची बैठक होणार आहे. परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री स्तरावरील ही बैठक होणार असून २+२ मंत्री स्तरावरील बैठक, असे नाव यास देण्यात आले आहे. आशिया खंडात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी अमेरिकेने भारताशी जवळीक साधली आहे. या बैठकीत अमेरिका भारतासोबत सॅटेलाईट माहितीचे आदानप्रदान करण्यास सहकार्य करार करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे भारताची क्षेपणास्त्र आणि बॉम्ब डागण्याची अचूकता वाढेल, असे बोलले जात आहे.

भारत अमेरिका सुरक्षा मुद्दे

संरक्षण साहित्य विक्री, सुरक्षा विषयक माहितीचे आदानप्रदान आणि लष्करी सराव करण्यातही अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. या सर्व क्षेत्रात अमेरिका भारताशी सहकार्य करत असून फक्त हिमालय क्षेत्रातील वादावर लक्ष्य केंद्रित केले नाही, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

चीन-भारत चर्चा बारगळली

भारत चीनमधील सीमावाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांत लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. लष्करी स्तरावरील बैठका अजूनही सुरू आहेत. मात्र, चीनने काही भागांतून मागे जाण्यास नकार दिला आहे. त्यास चीन तयार नाही. काही दिवसांपूर्वी भारतानेही सीमेवरील मोक्याच्या ठिकाणी ताबा मिळवला आहे. सीमेवर युद्धजन्य स्थिती तयार झाली आहे. अतिरिक्त लष्करी कूमक दोन्ही देशांनी तैनात केली आहे. रणगाडे, क्षेपणास्त्र, तोफा, लढाऊ विमाने भारताने सीमेजवळ सज्ज ठेवली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.