ETV Bharat / bharat

मोठी घोषणा ! 15 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने उघडणार लॉकडाऊन : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ - up lockdown updates

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदार, आमदार आणि मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत, राज्यातील लॉकडाऊन उघडण्यासाठी काही सुचना मागवल्या. तसेच त्यांच्याकडून आपापल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीबाबत अभिप्राय देखील घेतला.

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath
उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Apr 5, 2020, 12:46 PM IST

Updated : Apr 5, 2020, 5:44 PM IST

लखनऊ - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदार आणि मंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी 15 एप्रिलपासून राज्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडले जाईल, असे म्हटले आहे. तसेच या बैठकीत बोलताना त्यांनी राज्यात तबलिगी जमातमुळे परिस्थिती अधिक बिघडली असल्याचे म्हटले आहे. अन्यथा राज्यात आम्ही कोरोनाला रोखण्यास यशस्वी झाले होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

Chief Minister Yogi Adityanath interacts with MPs and ministers through video conferencing
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा खासदार आणि मंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद..

हेही वाचा... 'तबलिगी जमात' प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन..

राज्यात मागील तीन दिवसांत कोरोनाच्या प्रकरणात वाढ...

देशात कोरोनाचे 132 रुग्ण हे तबलिगी जमातशी संबंधीत आहेत. तसेच राज्यातही तबलिगी जमात संबंधीत 1499 लोकांची ओळख पटली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मागील 3 दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. यात तबलिगी जमातच्या लोकांचा सर्वाधिक आकडा असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेश राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 275 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगल्याप्रकारे उपाययोजना राबवत होतं. मात्र, मरकझ प्रकरणामुळे परिस्थिती बिघडल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तरिही येत्या 15 एप्रिलपासून राज्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Apr 5, 2020, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.