लखनऊ - उत्तर प्रदेशमधील सर्व आमदारांनी 'कोविड केअर फंड'साठी प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत, असे आवाहन योगी सरकारने राज्यातील आमदारांना केले आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी कोविड केअर फंडची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये विधान परिषद आणि विधान सभेच्या सर्व आमदारांनी आपापल्या एका महिन्याचा पगार आणि प्रत्येकी एक कोटी रुपये दान करावेत, असे आवाहन योगी सरकारने केले आहे. यासोबतच, राज्य सरकारने खासगी कंपन्यांनाही सीएसआर म्हणजेच 'व्यावसायिक सामाजिक जबाबदारी' निधीमधून काही रक्कम दान करण्याचे आवाहन केले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी कोरोनाशी या लढ्यामध्ये राज्य सरकारची साथ द्यावी, असे आदेश आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिली होती. याबाबत योगी सरकारने मायावतींचेही आभार मानले आहेत.
सध्या उत्तर प्रदेश विधान सभेमध्ये चारशे, तर विधान परिषदेमध्ये ९९ आमदार आहेत. या सर्वांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यास कोविड केअर फंडमध्ये सुमारे ५०० कोटींनी वाढ होऊ शकेल.
हेही वाचा : कोचीहून ११२ फ्रेंच नागरिक मायदेशी रवाना