नवी दिल्ली - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हुतात्मा जवान अश्विनी कुमार यादव यांच्या कुटुबीयांना 50 लाख देण्याचे जाहीर केले आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचेही जाहीर केले असून कायमस्वरूपी स्मारक म्हणून अश्विन कुमार यांचे नाव रस्त्याला देण्यात येणार आहे.
राज्यातील गाझीपूर येथील रहिवासी सीआरपीएफचे हुतात्मा जवान अश्वनी कुमार यादव यांच्या कुटुंबीयांना शासकीय तरतुदीनुसार मदत दिली जाईल. जम्मू आणि काश्मीरच्या हंदवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अश्विनी कुमार यादव हुतात्मा झाले होते. प्रत्यक्षात जिल्हा दंडाधिका्यांनी गाझीपूरच्या हुतात्म्याच्या कुटुंबाला 20 लाखांचा धनादेश दिला. यानंतर सरकारने याबाबत निवेदन काढून स्पष्टीकरण दिले.
काश्मीरमधील हंदवाडा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी, दोन जवान आणि एक काश्मीर पोलीस दलातील अधिकारी, असे पाच जण हुतात्मा झाले. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारा येथे ही घटना घडली. तर चांजामुल्ला भागात दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.