पुणे : पुण्यनगरी शहराला विद्येचं माहेर घर म्हटलं जाते, याच विद्येच्या माहेरघरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यावर नृत्य शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये असलेल्या नामांकित शाळेतील हा प्रकार आहे. मंगेश साळवे असं 11 वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाचं नाव आहे. याबाबत पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत शिक्षकाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
नृत्य शिक्षकाचा विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार : याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा नृत्य शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नृत्य शिकवत असताना आरोपी शिक्षक मंगेश साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हाथ लावत असे. एका 11 वर्षीय विद्यार्थ्यानं त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला. त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.
आरोपी शिक्षकाला ठोकल्या बेड्या : शाळेतील 11 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्यामुळे शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली. यापूर्वी सुद्धा त्यानं इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शिक्षकानं मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळताच पालकांकडून शाळेच्या बाहेर आंदोलन देखील करण्यात येत आहे. याबाबत वारजे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
नृत्य शिक्षकाचा आणखी एका विद्यार्थ्यावर अत्याचार : याबाबत पुण्यातील वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. नृत्य शिक्षकाला तत्काळ अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकावर आणखी एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकानं आणखीही विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा :