ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेश तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; 50 हजारांचा दंड - उत्तर प्रदेश तिहेरी हत्याकांड प्रकरण

स्थानिक कोर्टाने अडीच वर्षांपूर्वी भाऊ, वहिनी आणि त्यांच्या दोन मुलांना ठार मारल्याप्रकरणी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा ठोठावली असून 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

up-court-sentences-man-to-death-for-triple-murder
उत्तर प्रदेश तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; 50 हजारांचा दंडही ठोठावला
author img

By

Published : Nov 7, 2020, 3:41 PM IST

बांदा (यूपी) - स्थानिक कोर्टाने अडीच वर्षांपूर्वी आपला भाऊ, मेव्हणा आणि त्यांच्या दोन मुलांना ठार मारल्याप्रकरणी एकाला फाशीची शिक्षा तसेच 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. गोलू उर्फ अमित यादव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय होते प्रकरण-

अमितने 31 जानेवारी 2018 रोजी डेअरी व्यापारी महादेव यादव (40), त्यांची पत्नी चुन्नी (35) आणि त्यांची दोन मुले पवन (10) आणि राजकुमार (8) यांची हत्या केली होती. याप्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ​​गोलू उर्फ अमित यादव याला शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला असल्याचे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आशुतोष मिश्रा यांनी शनिवारी सांगितले. पुराव्यांअभावी कोर्टाने अमितची आई आणि मामा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणात एकूण सहा साक्षीदारांना कोर्टासमोर हजर करण्यात आले असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. पहाटे पाचच्या सुमारास महादेव यादव, त्यांची पत्नी आणि त्यांची दोन मुले व मुलगी झोपेत असताना अमित घरात घुसला त्याने कुऱ्हाडीचा वापर करून महादेव यादव व त्यांच्या दोन मुलांना ठार मारले. मुलीने स्वत: ला लपवून ठेवल्याने ती वाचली होती.

हेही वाचा- पाकिस्तानने केले युद्धबंदीचे उल्लंघन; सीमेवर गोळीबार आणि तोफांचा मारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.