ETV Bharat / bharat

अनलॉक वन : उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांमध्ये एकावेळी पाच जणांना प्रवेश

केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचा राज्यातील स्थितीनुसार बारकाईने अभ्यास करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनलॉक वननुसार धार्मिक स्थळे सुरू करण्याविषयी त्यांनी चर्चा केली.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Jun 5, 2020, 5:49 PM IST

लखनऊ - कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे आणि ‘अनलॉक वन’विषयी चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. धार्मिक स्थळे सुरू करणे आणि त्यातील प्रवेश यासह रुग्णालयांमधील व्यवस्था नीट राखणे, दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या कामगारांची तपासणी करणे आणि अर्थचक्र सुरू करण्याविषयी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचा राज्यातील स्थितीनुसार बारकाईने अभ्यास करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनलॉक वननुसार धार्मिक स्थळे सुरू करण्याविषयी त्यांनी चर्चा केली. धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल सुरू करण्याविषयी केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावे. धार्मिक स्थळे उघडण्याविषयी जिल्हाधिकारी आणि मंदिरांचे प्रमुख यांच्यामध्ये समन्वय ठेवावा. मंदिरात एका वेळी पाच पेक्षा जास्त लोकांना जाण्यास मनाई करावी. मूर्ती, फोटो, ग्रंथांना हात लावण्यास बंदी घालावी. भाविकांनी त्यांच्या चपला मंदिरात आणण्याऐवजी वाहनातच ठेवाव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे अपर मुख्य सचिव (गृह) अवनिष अवस्थी यांनी सांगितले.

रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांना योग्य सोयी-सुविधा देण्यासाठी आपण आग्रही आहोत. रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना सकस आहार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबर रुग्ण बरे होण्याचा दर वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. अर्थचक्र सुरू करण्याच्यासंदर्भात एमएसएमई सेक्टरमध्ये ऑनलाईन व्यवस्था सुरू करण्यात यावी. एमएसएमई क्षेत्राला कर्ज उपलब्ध करून देण्याविषयी बँकर्स कमिटीची बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.