ETV Bharat / bharat

'गुन्ह्यांची आकडेवारी लपवण्याचं सोडून मुख्यमंत्री योगींनी दुसरं केलंय तरी काय?'

author img

By

Published : Jul 7, 2020, 6:41 PM IST

गुंड विकास दुबे आणि आणि त्याच्या साथीदारांनी कानपूर जिल्ह्यात पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये 8 पोलीस शहीद झाले. या घटनेनंतर प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या सचिव प्रियंका गांधी यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. गुन्ह्यांची आकडेवारी लपवण्याचे सोडून मुख्यमंत्री योगींनी दुसरे काही केले नाही, असे त्या म्हणाल्या. गुंड विकास दुबे आणि आणि त्याच्या साथीदारांनी कानपूर जिल्ह्यात पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये 8 पोलीस शहीद झाले. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

प्रियंका गांधी यांनी राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी ट्विटरद्वारे जाहीर करत सरकारवर टीका केली आहे. राज्यातील खुनांच्या घटना पाहता उत्तर प्रदेशचा मागील तीन वर्षात पहिला क्रमांक राहीला आहे. राज्यात दरदिवशी सरासरी 12 खून होतात, असे त्या म्हणाल्या.

'राज्यात 2016 ते 2018 या काळात बालकांवर होणाऱ्या गुन्ह्यात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने आणि मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी लपविण्याचे सोडून दुसरे केलंय तरी काय. राज्यात गुन्हेगारांना जे सत्तेत बसलेत त्यांच्याकडून संरक्षण पुरवण्यात येतं, त्यामुळे ते राजरोसपणे फिरतात. मात्र, यासाठी आपले अधिकारी आणि जवान किंमत चुकवतायेत, असा आरोप प्रियंका गांधींनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.