ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण: मुख्य आरोपी कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेच्या शिक्षेसह २५ लाखांचा दंड

बहुचर्चित उन्नाव बलात्कार खटल्याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने आज(शुक्रवारी) निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Unnao Rape case
कुलदीप सेंगर
author img

By

Published : Dec 20, 2019, 2:30 PM IST

Updated : Dec 20, 2019, 4:34 PM IST

नवी दिल्ली- बहुचर्चित उन्नाव बलात्कार खटल्याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने आज(शुक्रवारी) निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १७ डिसेंबरला म्हणजेच सोमवारी न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

याबरोबरच पिडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. पिडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला असलेला धोका पाहून त्यांची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

२०१७ साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर मुख्य आरोपी होता. सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती.

  • 2017 Unnao rape case: Delhi's Tis Hazari Court has also ordered BJP expelled MLA Kuldeep Singh Sengar to pay a compensation of Rs. 25 lakhs to the victim https://t.co/xfaVVsOG0X

    — ANI (@ANI) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उन्नाव बलात्कार खटल्यातील पीडित तरुणी नातेवाईकांसह तुरुंगात असलेल्या काकांना भेटायला जात असताना २८ जुलैला त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये पीडितेसह तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. तर दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याच्या शक्येतेने सीबीआय पथक तपास करत होते. याप्रकरणी मागील काही दिवसांपासून सीबीआय पथक कसून तपास करत होते.

पीडितेच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर कुटुंबीयांनी या अपघातामागे कुलदीप सेंगरचा हात असल्याचा आरोप केला होता. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. तसचे कुटुंबीयांच्या मागणीनुसार पीडितेच्या कुटुंबीयांची दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था केली होते.

काय आहे प्रकरण ?

जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेल्यावर कुलदीप सेंगर याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सेंगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती.

हा अपघात सेंगरनेच घडवून आणल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला होता. खटल्यात सीबीआयने कुलदीप सेंगर, त्याचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. आता याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायललायाने निकाल दिला आहे.

Intro:Body:

Unnao rape case: Sengar 

Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.