ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण: 'तो' अपघात संशयाच्या भोवऱ्यात? सीबीआय चौकशीची मागणी

अपघातातील ट्रकचा चालक, मालक, क्लिनरच्या नंबरची माहिती गोळा केली जात आहे. त्यांचा संबंध बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेगर आणि त्याच्या संबंधित लोकांशी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

उन्नाव बलात्कार
author img

By

Published : Jul 29, 2019, 3:09 PM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये झालेल्या अपघातामध्ये उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता व वकील गंभीर जखमी झाले. तर याच प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि पीडितेची चुलती यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पीडितेच्या चुलत्यांनी पोलिसांकडे केली आहे.

या अपघात प्रकरणी बलात्कार पीडितेचे चुलते महेश सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबरच त्यांनी या अपघाताचा सीबीआय तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार या अपघाताची सीबीआयने दखल घ्यावी यासाठी पोलिसांकडून शिफारस केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी दिली आहे.

अपघातातील ट्रकचा चालक, मालक, क्लिनरच्या नंबरची माहिती गोळा केली जात आहे. त्यांचा संबंध बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेगर आणि त्याच्या संबंधित लोकांशी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडूनही करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे काका कलम ३०७ अंतर्गत रायबरेली येथील तुरूंगात आहेत. त्यांना भेटायला पीडिता आणि कुंटुंबातील अन्य २ जण जात होते. त्यादरम्यान, त्यांच्या कारने ट्रकला धडक दिली. पाऊस सुरू असताना वेगाने येणाऱया कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. रायबरेली मधील राष्ट्रीय महामार्ग २३२ वर अटोराजवळ गुरबख्श गंज पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली. अपघातानंतर स्थानिक लोकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास चालू आहे.

Intro:Body:

Unnao rape victim's accident Case being registered on complaint of Mahesh Singh

Unnao rape, victim accident, Case registered, complaint, Mahesh Singh, उन्नाव बलात्कार प्रकरण, सीबीआय चौकशी, रायबरेली 

उन्नाव बलात्कार प्रकरण : 'तो' अपघात संशयाच्या भोवऱ्यात? सीबीआय चौकशीची मागणी

लखनऊ - उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये झालेल्या अपघातामध्ये उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता व वकील गंभीर जखमी झाले. तर याच प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि पीडितेची चुलती यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पीडितेच्या चुलत्यांनी पोलिसांकडे केली आहे. 

या अपघात प्रकरणी बलात्कार पीडितेचे चुलते महेश सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबरच त्यांनी या अपघाताचा सीबीआय तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार या अपघाताची सीबीआयने दखल घ्यावी यासाठी पोलिसांकडून शिफारस केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी दिली आहे.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडूनही करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे काका कलम ३०७ अंतर्गत रायबरेली येथील तुरूंगात आहेत. त्यांना भेटायला पीडिता आणि कुंटुंबातील अन्य २ जण जात होते. त्यादरम्यान, त्यांच्या कारने ट्रकला धडक दिली. पाऊस सुरू असताना वेगाने येणाऱया कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. रायबरेली मधील राष्ट्रीय महामार्ग २३२ वर अटोराजवळ गुरबख्श गंज पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली. अपघातानंतर स्थानिक लोकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास चालू आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.