उदयपूर - देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानाला प्रत्युत्तर देत केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही काँग्रेसची चुकीची मानसिकता असल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधींच्या काळात लागलेल्या आणीबाणीच्या वेळेस देशातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, देशात भाजप सत्तेत आल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असून काँग्रेस नेते बेजबाबदार वक्तव्य करत आहेत असे ते म्हणाले. ते रविवारी उदयपूरमध्ये आयोजित एका पत्रकारपरिषदेत बोलत होते.
मेघवाल म्हणाले, देशात भाजप सत्तेत आला आहे तेव्हापासूनच असहिष्णुता आणि आणीबाणी सारखे शब्द सतत कानावर पडायला लागले आहेत. मात्र, असे प्रत्यक्षात असे काहीही नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यावेळी ५ वर्षांऐवजी निवडणुका ६ वर्षाच्या अंतराने घेण्यात आल्या. संविधानाची हत्या करण्यात आली, तो प्रकार आणीबाणीचा होता. मात्र, केंद्रात भाजप सत्तेवर आला आहे आणि वेळेवर देशात निवडणुका होतात तेव्हा विपक्ष असे विधान करतात. मात्र, ते पूर्णत: बेजबाबदार असल्याचे मेघवाल म्हणाले. भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे म्हटले होते. त्यावर उत्तर स्वरुपात केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा - LIVE : जेएनयू हिंसाचार प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
हेही वाचा - जेएनयू हिंसाचार : सर्वच स्तरातून निषेध