ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, मनोज तिवारींनी घेतली जखमींची भेट - मनोज तिवारी

दिल्लीमध्ये तीन दिवसांच्या हिंसेनंतर शांतता प्रस्थापित होत आहे. हिंसाचार झालेल्या भागात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली बसलेल्या आंदोलकांना हटवले आहे.

दिल्ली हिंसाचार
डॉ. हर्ष वर्धन आणि मनोज तिवारी रुग्णांची भेट घेताना
author img

By

Published : Feb 26, 2020, 10:38 AM IST

Updated : Feb 26, 2020, 10:46 AM IST

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांची केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी भेट घेतली. यावेळी दोघांनी जखमींची विचारपूस केली. गुरु तेग बहादूर रुग्णालयात १५० पेक्षा जास्त जखमींवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, मनोज तिवारींनी घेतली जखमींची भेट

दिल्लीमध्ये तीन दिवसांच्या हिंसेनंतर शांतता प्रस्थापित होत आहे. हिंसाचार झालेल्या भागात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली बसलेल्या आंदोलकांना हटवले आहे. सीलमपूर, मौजपूर, भजनपुरा आणि गोकुलपूरी परिसरात सुरक्षा दल तैनात असून परिसरात शांतता आहे.

१५० पेक्षा जास्त जखमींवर सुरू आहेत उपचार

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी जखमींची विचारपूर केली. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर देखील चर्चा केली. जखमींपैकी अनेकांना बंदुकीची गोळी लागली आहे. तसेच काठ्या आणि लोखंडी रॉडने जखमी झालेले अनेक रुग्ण आहेत.

Last Updated : Feb 26, 2020, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.