नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना 13 स्पटेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या विशेष पथकाद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहिती नुसार त्यांची प्रकृती स्थिर असून 'रुटीन चेकअप' करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते.
2 ऑगस्टला गृहमंत्र्यांना कोरोची लागण झाली होती. उपचारानंतर कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने 14 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा 18 ऑगस्टला थकवा आणि अंगदुखीमुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावर पुन्हा 30 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा 13 ऑगस्टला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.