नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी वाहतूकीच्या विकासासाठी विशेष तरतूद केली आहे. रस्ते वाहतूकीच्या प्रकल्पामध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवणार असून, ग्रामसडक योजनेसाठी ८० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामसडक योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात १ लाख २५ किमीच्या रस्ते निर्मितीचे लक्ष ठेवले असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या. तसेच सागरमाला आणि भारतमाला हे देशातले महत्त्वाचे प्रकल्प आहेत. सागरमाला प्रकल्पामुळे जलमार्गांचा विकास होण्यास सुरूवात झाली आहे. तर भारतमला प्रकल्पांमुळे देशाचा विकास होणार आहे. प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत आम्ही गावं शहराशी जोडण्याचं काम केलं असेही त्या म्हणाल्या.
स्वदेशी या शब्दाला मोदी सरकारने मेक इन इंडियाचे रूप दिले आहे. असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. पायाभूत सोयी सुविधांवर अधिक खर्च करण्याची गरज आहे. उडान योजनेमुळे हवाई प्रवास सुखकर झाला असेही त्या म्हणाल्या.