ETV Bharat / bharat

लॉकडाऊनच्या फटका बसलेल्या कला-संस्कृतीला युनेस्कोचा मदतीचा हात - UNESCO

सांस्कृतिक उद्योग आणि वारसा यांना पाठिंबा देण्यासाठी युनेस्कोने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जागतिक सोशल मीडिया मोहिमेसह या सामूहीक बंदीच्या काळात आपल्या सांस्कृतिक वारसांला अनेकांपर्यंत पोहचवण्यासाठी #ShareOurHeritage हा उपक्रमही सुरु केला आहे. सोबतच गुगल कला आणि संस्कृती यांच्याकडून तांत्रिक सहाय्य आणि इतर पुढाकारांतून जगभरातील डझनभर वारसा संपत्तीचे ऑनलाइन प्रदर्शन करण्याचा मानस युनेस्कोचा आहे.

UNESCO launched a global social media campaign, #ShareOurHeritage

author img

By

Published : Apr 27, 2020, 3:12 PM IST

हैदराबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि “सोशल डिस्टन्सिग”मुळे जगभरातील कला आणि संस्कृती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांना “आंतरराष्ट्रीय सहाय्य” देण्याची मागणी करत आणि या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) अनेक ऑनलाइन उपक्रम सुरू केले आहेत.

कोविड-१९ च्या संकटकाळात लोकांना दिलासा देण्यासाठी कला, संस्कृती आणि वारसा या संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. या संबंधी प्रतिक्रिया देताना युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अझौले म्हणाले की, “युनेस्को ही जागतिक स्तरावरील चर्चेसोबतच नेतृत्व करण्यासाठी वचनबद्ध आहे. कोविड -१९ सारख्या महाभयंकर साथीच्या काळात कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांना अधिक चांगल्या पद्धतीने कसा पाठिंबा देता येईल आणि मानवतेशी जोडणार्‍या या वारसा आणि संस्कृतीच्या संपर्कात राहण्याची शाश्वती कशी देता येईल, याचा विचार करत आहोत.

सांस्कृतिक उद्योग आणि वारसा यांना पाठिंबा देण्यासाठी युनेस्कोने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जागतिक सोशल मीडिया मोहिमेसह या लॉकडाऊनच्या काळात आपल्या सांस्कृतिक वारसांला अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी #ShareOurHeritage हा उपक्रमही सुरू केला आहे. सोबतच गुगल कला आणि संस्कृती यांच्याकडून तांत्रिक सहाय्य आणि इतर पुढाकारांतून जगभरातील डझनभर वारसा संपत्तीचे ऑनलाइन प्रदर्शन करण्याचा मानस युनेस्कोचा आहे.

कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे जगातील ८९ टक्के देशांनी आपल्या देशातील सांस्कृतिक वारसा केंद्रे अशतः किंवा पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सांस्कृतिक वारसा केंद्रांची अद्ययावत माहिती ऑनलाइन नकाशाद्वारे आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील सर्व लोकांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय यूएनच्या संस्थानी घेतला आहे.

कोव्हिड-१९ सारख्या रोगाशी लढताना आणि आपल्या आसपास राहणाऱ्या इतर लोकांच्या संपर्कात येणाऱ्या जागतिक वारसा केंद्राचे व्यावस्थापक यांच्याकडून मिळणारी वास्तविक माहिती युनेस्को द्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जगभरातील लहान मुलांना त्यांची सृजनशीलता अभिव्यक्त करता यावी त्यासाठी व्यासपीठ निर्माण करुन देण्यात येणार आहे.

याच्यामाध्यमातून लहान मुलांना जगभरातील विविध सांस्कृतिक वारसा केंद्राची रेखाचित्रे रेखाटण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे संकट टळल्यानंतर जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी #ShareCulture आणि #ShareOurHeritage या मोहिमा तशाच चालू ठेवण्यात येणार आहेत.

१५ एप्रिल २०२० रोजी असणाऱ्या जागतिक कला दिनाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक संगीतकलेचे प्रणेते आणि युनेस्कोचे गुडवील राजदूत जीन मिशेल जर्रे यांच्या मदतीने युनेस्कोने ऑनलाइन रेसिलीआर्ट डिबेट या सोशल मीडिया मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून कलाकार आणि प्रसिद्ध अभिनेत्यांना एकत्र आणून कोवीड-१९ चा परिणाम झालेल्या कलाकारांकडे आणि सांस्कृतिक व्यावसायिकांकडे लक्ष्य वेधून घेण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच कोरोनाशी लढण्यासाठीची धोरणं आणि वित्तीय यंत्रणा याची माहिती देण्यासाठी या वादविवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा फायदा निर्माते आणि सृजनशील कामगारांना कोवीड-१९ सारख्या महाभयंकर रोगाच्या संकटावर मात करण्यासाठी होणार आहे. जगभरातील निर्माते आणि सृजनशील कारागिरांना रशीली आर्ट डिबेट या मोहिमेशी जोडण्यासाठीही प्रोत्साहीत करण्यात येणार असून याच्या माध्यमातून या बंदिच्या काळात कलाकारांनी तयार केलेल्या कलांचे सादरीकरण करण्याची संधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

२२ एप्रिल रोजी कोवीड-१९या साथीच्या रोगाचा कला संस्कृती क्षेत्रावर झालेल्या परिणामाबद्दल जगभरातील सांस्कृतिक मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे युनेस्कोने स्पष्ट केले आहे. सध्याच्या काळात लोकांना संस्कृतीची सर्वात जास्त गरज आहे, असे युनेस्कोचे संस्कृतीचे सहायक महासंचालक एर्नेस्टो ऑटोन आर म्हणाले.

“संस्कृती आपल्याला लवचिक बनवते. भविष्याबाबत आशा निर्माण करते. त्याचबरोबर संस्कृती आपल्याला आठवण करून देते की या संकटकाळात आपण एकटे नाही आहोत. म्हणूनच युनेस्को संस्कृतीला पाठिंबा देण्यासाठी, आपल्या वारशाचे रक्षण करण्यासाठी आणि कलाकार व निर्माते यांना सशक्त करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

सांस्कृतिक वारसा स्थळे, संग्रहालये, चित्रपटगृहे आणि इतर सांस्कृतिक संस्था बंद केल्याने कलाकार आणि सर्जनशील उद्योगांवर विलक्षण परिणाम झाला आहे. तसेच त्यांची आर्थिक गणितं बिघडल्याने स्थानिक समुदाय आणि सांस्कृतिक व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोविड -१९ सारख्या महामारीमुळे सांस्कृतिक वारसाबरोबरच यावर आधारित इतर विधी आणि समारंभांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. सोबतच यावर विसंबून असणाऱ्या समुदायाचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे. तसेच कोवीड-१९ च्या प्रादुर्भामुळे बर्‍याच जणांना आपल्या नोकऱ्यादेखील गमवाव्या लागल्या आहेत. जगभरातील बहुतेक कलाकर हे कलेतून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून असतात. मात्र, या महामारीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे म्हणुन जगभरातील अनेक कलाकार हवालदिल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.